HW News Marathi
मनोरंजन

क्रिसमस विषयी थोडक्यात…

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी हा सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मियांच्या श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.

त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाकरे सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंगलाच निर्माते व दिग्दर्शकांमध्ये रंगले मानआपमान नाट्य

News Desk

श्रींचा बाप्पा यंदा भगव्या महालात

News Desk

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

News Desk
व्हिडीओ

मायावती यांची मोठी घोषणा, मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये कॉंग्रेसला पाठिंबा

News Desk

5 विधानसभा निवडणुकांचे निकाल (2018) आले आहेत. छत्तीसगढमध्ये बहुमत मिळविण्यात काँग्रेसला यश आले आहे. मात्र राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसला इतर पक्षांच्या पाठींब्याची आवश्यकता होती.राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, बहुमतापासून काँग्रेस फक्त दोन हात दूर आहे. मायावतींच्या बसपाच्याही दोन जागा मध्य प्रदेशात निवडून आल्या आहेत. मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानं काँग्रेसला बहुमताएवढं संख्याबळ प्राप्त झालं आहे.

Related posts

कोरोना अपडेट | ‘कोरोनासोबत जगायला शिका’ WHO चा इशारा | WHO

swarit

एका महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची धाड; सरकार विरोधात मुश्रीफ कार्यकर्त्यांचा संताप

Chetan Kirdat

राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांना शिवसेनेचा दणका? शिवसेना-राष्ट्रवादीत तणावाची शक्यता

News Desk