HW News Marathi
मनोरंजन

…म्हणून नाताळमध्ये दिल्या जातात भेटवस्तू

भगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात. पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग.

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात.

अलिकडच्या काळात ख्रिसमसचे औचित्य साधून भेट वस्तू देणे हा ट्रेंड बनला आहे. कार्यालयात, कॉलेजमध्ये आणि घरी सुद्धा अनेक वेगवेगळ्या भेट वस्तूंची देवाण घेवाण करुन तरुणाई आनंद द्विगुणीत करताना पहायला मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतराळाचे कुतूहल कलेतून मांडणारी पिंगळा मोरे ठरली ‘डुडल फॉर गुगल’ची विजेती

News Desk

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचे निधन

News Desk

आगमन बाप्पाचे | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर, मूर्तिकारांच्या हातांना वेग

Gauri Tilekar