HW News Marathi
मनोरंजन

नाताळसाठी बाजारपेठ सज्ज

मुंबई | नाताळ अगदी काही दिवसांवर आल्यामुळे मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात येशू व मेरी यांच्या जीवनपट सांगणारे पुतळ्यांचे संच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जन्म ते मृत्यूपर्यंतची कहाणी सांगणारे विविध प्रकारचे पुतळे ३०० ते ६ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा हेअर बॅण्डवर विविध आकारांचे सांता उपलब्ध असून त्याला अधिक मागणी आहे.

सजावटीचे साहित्यखरेदीला ग्राहकांची लगबग सुरू आहे. मात्र बाजारपेठेत मेड इन चायना वस्तू, सजावटीचे साहित्य मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. मागील वर्षी प्रत्येक सणामध्ये भारतीय बनावटीच्या साहित्यांचा पुरवठा व मागणी होती. ग्राहक तेसच विक्रेते भारतीय बनावटी वस्तूंना प्राधान्य देत होते.

यंदा मात्र बाजारात ‘मेड इन इंडियाची क्रेज कमी दिसत असून चायना मेड वस्तूच अधिक उपलब्ध आहेत. यामध्ये सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, बेल्स, चांदणी, खेळणी, सांताक्लॉज असलेले हेअर बॅण्ड, येशू व मेरी यांचे पुतळे, रोषणाई व विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ‘ मिर्झा गालिब ‘ यांची २२१ वी जयंती

News Desk

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

News Desk

गणपतीच्या आगमनासाठी सलमानने रद्द केली शुटींग

News Desk