HW News Marathi
मनोरंजन

“बेबिन्का” गोवा स्पेशल मिठाई

ख्रिश्चन समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात नसला तरी भारतात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व ख्रिश्चन बांधव आपली घरे सुशोभित करातात. या उत्सवासाठीची तयारी आठवडाभरपुर्वीपासुनच सुरु होते. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मित्र परीवारात भेटींचे आयोजन केले जाते. उत्सव कुठलाही असू द्या तो विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांशिवाय अपुर्णच. चमचमीत असे, तर काही तोंड गोड करणारे असे मिष्टान्न असले की उत्सवाची रंगत काही औरच असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाताळ उत्सवासाठी केल्या जाणाऱ्या अशाच काही खास पाककृती.

साहीत्य

400 मीली नारळाचे दूध

300 ग्रमॅ साखर

180 ग्रॅम मैदा

8 अंड्याचे पिवळे बलक

अर्धी वाटी तुप

२ चमचे साखर

1 चमचा पाणी

चिमुटभर मीठ

कृती

1 एका भांडयात साखर आणि पाणी घेउन गॅसवर ठेवा साखर पुर्ण विरघळू त्याचा घट्ट पाक तयार झाला की गॅसवरुन उतरवुन ठंड करुन घ्या.

2 दुसऱ्या एका भांड्यात ३०० ग्रॅम साखर आणि अंडे घेउन बीटरन चांगले फेटुन घ्या त्यामध्ये थोडं थोडं नारळाचं दुध आणि मैदा घालुन फेटुन घ्या

3 त्यामध्ये तुप टाकुन परत एकदा फेटुन घ्या शेवटी चिमुटभर मीठ घालुन परत १ मी. फेटुन घ्या

4 या मिश्रणाचे दोन वाट्यांमध्ये काढुन दोन भाग करुन घ्या यातील एका भागात आधी तयार केलेला साखरेचा पाक मिसळुन घ्या

5 एका जर्मनच्या भांड्यात तुप लावुन वरिल एका मिश्रणातील अर्धे मिश्रण घाला त्यावर साखरेचा पाक मिसळलेले मिश्रण घाला आणि १८० सें १५ मी बेक करा.

6 वरिल बेक केलेल्या मिश्रणावरच एक चमचा तुप घालुन पुर्ण पसरवुन घ्या आणि त्यावर परत वरिल दोन्ही उरलेले मिश्रणाचे थर घालुन परत १८० सें वर १५ मी बेक करा. पुर्ण बेक झाल्यावर थंड करुन एका प्लेटमध्ये काढुन तयार मिठाइचे छोटे छोटे काप करा.

मिठाई खायला तयार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात…

News Desk

मुंबईतील ‘या’ चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात नाताळ

News Desk

दिवाळीचा पाडवा, साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त

News Desk