HW News Marathi
मनोरंजन

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

ख्रिश्चन समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात नसला तरी भारतात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व ख्रिश्चन बांधव आपली घरे सुशोभित करातात. या उत्सवासाठीची तयारी आठवडाभरपुर्वीपासुनच सुरु होते. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मित्र परीवारात भेटींचे आयोजन केले जाते. उत्सव कुठलाही असू द्या तो विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांशिवाय अपुर्णच. चमचमीत असे, तर काही तोंड गोड करणारे असे मिष्टान्न असले की उत्सवाची रंगत काही औरच असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाताळ उत्सवासाठी केल्या जाणाऱ्या अशाच काही खास पाककृती.

साहित्य

अर्धा किलो मैदा

अर्धा किलो रवा

अर्धा टीस्पून बेकिंग पावडर

2 अंडी

1 वाटी नारळाच दुध

व्हेनीला इसेंन्स

4 टेस्पून. पीठी साखर

1 टेस्पून. लोणी

तळणासाठी तेल

1 वाटी साखर

3 ते 4 टेस्पून. पाणी

कृती

1 मैदा आणि बेकींग पावडर चांगले मिसळून घ्या

2 मैद्यात थोडे थोडे लोणी घालून व्यवस्थित फेटून घ्या

3 एका वेगळ्या भांड्यात अंडे फेटुन घ्या आणि वरिल मैद्याच्या मिश्रणात घालून फेटा, त्यात थोडे व्हॅनीला इसेंस घाला व परत फेटा.

4 त्यामध्ये पीठी साखर आणि नारळाच दुध घालुन त्या सर्व मिश्रणाचा मऊसर गोळा बनवुन घ्या.

5 तयार गोळ्याचे छोटे छोटे गोळे करुन घ्या.

6 एक छोटा गोळा घेउन काट्याच्या चमच्या वर (फोक) मागच्या बाजुस दाबुन छोटीशी पाती तयार करा नंतर ती पाती थोडी दुमडून घ्या त्याला शिंपल्या सारखा आकार येइल.

7 हे तयार कलकल तेलात तळून घ्या

पारंपारीक पोर्तुगीज कलकल तयार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

Aprna

ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचे निधन

News Desk

व्ही. शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह

News Desk