HW News Marathi
मनोरंजन

ख्रिसमस ट्री नक्की का सजवला जातो !

डिसेंबर महिन्यात येणा-या ख्रिसमस सणाचे जगभरात सर्वांनाच वेध लागलेले असतात. हा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो . ख्रिश्चन धर्मियांच्या घरी तर या सणाची अगदी लगबग पहायला मिळते. या सणाच्या निमित्ताने सजवला जाणारा ख्रिसमस ट्री मात्र लहाणांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाचे आकर्षण असतात. पण हा ख्रिसमस ट्री नक्की का सजवला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

घरात ख्रिसमस ट्री या आशेने सजवला जातो की जेणेकरून सँटाक्लोज खुश होईल आणि आपल्या घराला निरनिराळ्या वस्तू भेट देईल. या ख्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. १६ व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड ख्रिसमस ट्री म्हणून सजवायचे परंतु कालानुरूप ख्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वरुपात ख्रिसमस ट्री उपलब्ध होतो.

ख्रिसमस ट्री वर तुम्ही स्टार्स अर्थात तारे लावेलेले पाहिले असतील. ख्रिसमस ट्रीच्या सगळ्यात वर टोकाला जो स्टार लावला जातो तो बेथेलेहेमच्या त्या ताऱ्याचे प्रतीक आहे ज्याच्या सहाय्याने लोक प्रभू येशू पर्यंत पोचले होते. ख्रिसमस ट्री वर एक चमकदार गोल बॉल्स देखील आढळून येते त्याला Tinsel म्हणतात. केवळ ख्रिसमसचं नाही तर प्रत्येक प्रसंगावेळी याचा सजावटीसाठी वापर केला जातो.

ख्रिसमस ट्री वर मेंढपाळाच्या हाती असणाऱ्या काठीच्या आकाराच्या candy canes लावलेल्या आढळतात. यांवर असणारा लाल रंग प्रभू येशूच्या रक्ताचे प्रतिक आहे, तर पांढरा रंग ख्रिश्चन धर्मीयांची रक्षा करण्याची भावना दर्शवतो. मुख्य गोष्ट म्हणजे हे केवळ सजावटीसाठी ख्रिसमस ट्री वर अडकवले जात नाही, तर तुम्ही candy canes खाऊ देखील शकता, त्यांची चव अतिशय सुरेख असते.

ख्रिसमस ट्री वर werath अर्थात डोक्यावर चढवण्याची माळा लावण्यामागे देखील एक कारण आहे. प्राचीन परंपरेनुसार ही माळा म्हणजे काटेरी मुकुटाचे प्रतीक आहे. प्रभू येशूला सुळावर चढवण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट घालण्यात आला होता. त्याची आठवण म्हणून तसेच प्रभू येशुबादा बद्दलची भक्ती प्रतीत होण्यासाठी werath ख्रिसमस ट्री वर लावली जाते.

ख्रिसमस ट्री कडे लक्ष जाताच Bells अर्थात प्लास्टिकची घंटा सर्वात प्रथम आपले लक्ष वेधून घेते. ही घंटा मेंढपाळाच्या त्या घंटेचे प्रतीक आहे जी वाजवून तो आपल्या मेंढ्यांना माघारी बोलवायचा. ख्रिसमस ट्री वर अनेक लहान-सहान Bells अडकवल्या जातात, सोबतच घराच्या दरवाज्यावर देखील मोठी Bell लावली जाते. आकाशातील ताऱ्यांचे प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्री वर Lights लावल्या जातात. यामागे कोणतीही परंपरा नसून केवळ सजावटीच्या उद्देशाने आणि ख्रिसमस ट्री खुलून दिसावा म्हणून विविध रंगातील Lights लावल्या जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरानुष्का नंतर या सेलिब्रेटी जोडप्याची आहे चर्चा; खान कन्येचं कुणावर आलं दिल ?

swarit

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Aprna

प्रदर्शनाच्या आधीच ‘2.0’ वादाच्या भोवऱ्यात

News Desk