HW News Marathi
मनोरंजन

या मकरसंक्रांतीला तुमच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा अन् वाढवा नात्यांमधील गोडवा

आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने आपण आपल्या नातेवाईकांसोबत सदैव स्मरणात राहतील असे क्षण व्यतित करतो. आपल्या माणसांना जवळ आणणे हाच सण-उत्सव साजरे करण्यामागचा मुख्य हेतू आहे. विशेषतः मकरसंक्रांतीचा सण हा आपल्याला नात्यांमधील गोडवा वाढवायला शिकविणारा सण आहे. त्यामुळे, या मकरसंक्रांतीला आपल्या प्रियजनांना या खास शुभेच्छा द्या आणि वाढवा तुमच्या नात्यामधील गोडवा !

तिळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी

हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

 

साजरे करु मकर संक्रमण

करुण संकटावर मात

हास्याचे हलवे फुटून

तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

 

काळ्या रात्रीच्या पटलावर

चांदण्यांची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा

तुला फारच शोभुन दिसते

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

 

नाते तुमचे आमचे

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्यासंगे

अधिक दॄढ करायचे….

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयनॉक्स थिएटरमध्ये ‘ठाकरे’च्या पोस्टरवरून शिवसैनिकांचा राडा

News Desk

इंटीमेट सीन्स करताना प्रचंड घाबरलेली मधुरिमा

News Desk

उमेश आणि प्रियाची गुड न्यूज…!

News Desk