HW News Marathi
मनोरंजन

मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे गजक

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरु होते, म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकण्यास सुरवात होते. या बदलाला अतिशय शुभ मानले जाते. भारताच्या विविध भागात संक्रांती या सणाची विविध नावे आहेत. महाराष्ट्रात मकरसंक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडुतील थाई पोंगल तर आसाम मधील भोगली बिहू. हिच विविधता येथील खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त अशाच काही विविध पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

तीळ १ वाटी

शेंगदाणे १ वाटी

गुळ १ वाटी

तूप २ चमचे

कृती

एका पातेल्यात तीळ घेऊन ते तीळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. तीळाचा रंग थोडा बदलल्यावर गॅसवरुन काढून थंड करुन घ्या. दुसऱ्या एका पातेल्यात १ चमचा तूप टाकून त्यामध्ये गूळ घाला आणि त्याचा पाक करुन घ्या. दुसरीकडे भाजलेल्या तीळातील थोडे तीळ बाजुला काढून ठेवा आणि उरलेले तीळ बारीक करुन घ्या. सोबतच शेंगदाने बारीक करुन घ्या. दाण्याचे कूट आणि बारीक केलेले तीळ गुळाच्या पाकात टाकून व्यवस्थित एकत्र करुन घ्या. सर्व मिश्रण एकत्रित करून झाल्यावर गॅसवरुन उतरवून थोड थंड करुन घ्या. एका लाकडी बोर्डवर थोडं तूप लावून वरील मिश्रण त्यावर हाताने पसरवून चौकोनी आकारात पाती बनवून घ्या त्यावरुन बाजूला काढून ठेवलेले सगळे तीळ टाकून पुन्हा एकदा पाती थापून घ्या थंड झाल्यावर चौकोनी आकारात वड्या कापून घ्या. गजक तयार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

LIVE UPDATE : “बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला”

News Desk

आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

Gauri Tilekar

जे खोटे आहे ते खोटेच आहे

Gauri Tilekar