HW News Marathi
मनोरंजन

मकरसंक्रांतीशी स्त्रिया-नवजात बालकांचे विशेष नाते

मकरसंक्रांतीला लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला ‘पाटावरची वाणे’ देतात. या काळात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी-कुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात. या वस्तू ‘लुटल्या’ जातात. लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाचा डब्बा, कंगवा, आरसा, बांगड्या, काळे मणी इ. देतात. त्याच्या पुढल्या वर्षी इतर कोणत्याही वस्तू दिल्या जातात.

लग्नानंतर येणारी संक्रांत नवीन सुनेच्या त्याचप्रमाणे नवजात बालकाच्या कौतुकाची असते. काही घरात तर पहिल्या संक्रांत सणाला हळद कुंकवाच्या राशी टेबलावर मांडतात. त्यातून प्रत्येकी आपल्याला हवे तेवढे घ्यायला सांगतात. यालाच वाण लुटणे असे म्हणतात.

नवीन सुनेला काळी साडी, हलव्याचे दागिने घातले जातात. गळ्यात हार, मंगळसूत्र, बिंदी, कानातले, कमरपट्टा, बाजूबंद या अलंकारांनी सजविले जाते. तर नवजात बालकाचे ‘बोरन्हाण’ केले जाते. एका पाटावर मधोमध बाळाला बसून भोवताली त्याच्या लहान मुलांना बसविले जाते. त्या बाळाला काळे कपडे, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली याने सजविले जाते. त्यानंतर या बाळाच्या डोक्यावर अलगदपणे कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या वस्तू ओतल्या जातात. यात इतर लहान मुलेही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. नव्याचे स्वागत करणे त्यातून आनंद घेणे हा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kargil Vijay Diwas : जवानांच्या शौर्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले सलाम

News Desk

आता बाप्पा पण झाला सिंघम?

swarit

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

News Desk