HW News Marathi
मनोरंजन

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तिळाचे लाडू

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरु होते, म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकण्यास सुरवात होते. या बदलाला अतिशय शुभ मानले जाते. भारताच्या विविध भागात संक्रांती या सणाची विविध नावे आहेत. महाराष्ट्रात मकरसंक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडुतील थाई पोंगल तर आसाम मधील भोगली बिहू. हिच विविधता येथील खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त अशाच काही विविध पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

तीळ

गूळ

वेलची

तूप

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात तीळ घेऊन मंद आचेवर भाजून घ्या. भाजलेले तीळ थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यामध्ये गूळ घालून दोन्ही पदार्थ एकत्र करुन घ्या. तयार झालेल्या तीळगूळामध्ये थोडं तूप घाला आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्रित करुन त्याचे लाडू बांधून घ्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन

News Desk

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर

News Desk

थंडावा देणारा ताडगोळा

swarit