नवी दिल्ली | भारतीय नौदलाने गेल्या दहा वर्षांत समुद्री चाच्यांकडून होणाऱ्या जहाजांच्या लुटीचे ४४ प्रयत्न हाणून पाडले आहेत. तर १२० दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांनी सांगितले आहे. भारतीय नौदल भारताच्या समुद्री सीमांचे दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत असल्याची खात्री यावेळी त्यांनी दिली.
Navy Chief Admiral Sunil Lanba: So far the Indian Navy has thwarted 44 piracy attempts & apprehended 120 pirates. https://t.co/wIwJNmQWTS
— ANI (@ANI) December 3, 2018
“नौदलाकडून ५६ महाशक्तिशाली जहाजे आणि पाणबुड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या नौदलाची ताकद वाढणार असून शत्रू राष्ट्रांना धडकी भरेल. सध्या, समुद्र तटावरील सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने, मच्छीमारांच्या जवळपास २.५ लाख जहाजांवर अॅटोमॅटीक आयडेंटीटी करणारे ट्रान्सपोंडर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच तिसऱ्या विमानवाहक जहाजालाही सामावून घेण्यात येईल”, असे एडमिरल लांबा यांनी म्हटले आहे.
मालदीवमध्ये भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छिणारे सरकार बनल्यास दोन्ही देशांची समुद्री सुरक्षा आखीन शक्तिशाली होईल. तर अदनच्या खाड्यांमधील समुद्री डाकूंविरुद्ध मोहिमेला सध्या प्रतिबंध घालण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन याबाबत उपाय काढण्यात येत आहे. नौदलाने २००८ पासून ७० भारतीय महाशक्तिशाली जहाजांच्या मदतीने ३४४० पेक्षा अधिक जहाज आणि त्यातील २५ हजार प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचवले आहे, हेही लांबा यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आम्ही असून त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत, असेही लांबा यांनी म्हटले.
Navy Chief Admiral Sunil Lanba: As regards our commitment to thwarting piracy in Gulf of Aden, Navy remains committed to curbing this global menace. Since 2008, 70 Indian naval warships have been deployed, which safely escorted over 3440 ships with over 25,000 mariners on board. pic.twitter.com/HYvi4AXwpm
— ANI (@ANI) December 3, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.