यंदा भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आहे. संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील राजपथवरून भारतीय सैन्याच्या संचलनासह भारतातील विविध राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथ तयार केले जातात. विविध राज्यांच्या संस्कृती लक्षात घेऊन तयार केलेले हे सुंदर असे चित्ररथ या दिवसाचे मोठे आकर्षण आहे.
प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही संबोधले जाते. भारतीय संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० सालापासून भारतीय संविधान अंमलात आणण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात भारताचा तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारीला राज्यघटना अंमलात आणण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.