HW Marathi
News दिवाळी 2018

शहीद कर्नल महाडिक यांच्या वर्गमित्रांची सैन्याला अनोखी दिवाळी भेट

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वर्गमित्रांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी शहीद कर्नल महाडिक यांच्या युनिटसाठी २५० किलो मिठाई दिवाळी भेट म्हणून पाठवली आहे. कर्नल संतोष महाडिक हे राष्ट्रीय रायफल्स ४१ चे कमांडिंग ऑफिसर होते. नोव्हेंबर २०१५ रोजी कर्नल महाडिक कुपवाडामधील हाजीनाका फॉरेस्ट येथे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत गंभीर जखमी झाले होते.

“सुमारे २५० किलो मिठाई चंदिगढहुन श्रीनगरला आज (बुधवार) पोहोचली असून ती कर्नल महाडिक यांच्या ‘राष्ट्रीय रायफल्स ४१’ ला लवकरच वाटण्यात येईल”, असे या उपक्रमात पुढाकार घेतलेल्या त्यांच्या एका मित्राने एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

कर्नल महाडिक हे सातारा सैनिक स्कुलचे विद्यार्थी होते. कर्नल महाडिक यांना ऑपरेशन रायनोसाठी सेना मेडल मिळाले होते. सातारा सैनिक स्कुलमधील कर्नल महाडिक यांच्या वर्गमित्रांनी ३ वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमाला ‘ऑपरेशन दिवाळी’ असे नाव दिले आहे.

कर्नल महाडिक यांच्या आठवणी सांगताना त्यांचे मित्र म्हणाले कि, “कर्नल महाडिक हे एक उत्तम फुटबॉल गोलकिपर, एक उत्तम घोडेस्वार आणि एक उत्कृष्ट बॉक्सर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.”

Related posts

माझ्या आठवणीतली दिवाळी | Rutuja Bagwe

News Desk

दिवाळी पहाट कार्यक्रमाला पूर्व उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Gauri Tilekar

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

Gauri Tilekar