HW News Marathi
शिक्षण

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार ” योजना.

6० टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी सन २०१६-१७ पासून राज्य शासनाने सुरु केली ही योजना

उत्तम बाबळे

नांदेड :- इयत्ता अकरावी, बारावी , त्या नंतरच्या व्यावसायिक व अन्य शिक्षण घेत असलेल्या पण वस्तिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन २०१६-१७ पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे.

या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ जिल्हयातील (जात प्रमाणपत्र जेथून काढले आहे) सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयात दि.१६ मार्च २०१७ पर्यंत अर्ज सादर करावेत.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १०वी, १२वी ,पदवी, पदविका परिक्षेमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण असणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा म्हणजे विद्यार्थी स्थानिक नसावा (विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा), गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्त्याचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक करून घेणे बंधनकारक आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेले विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही. या योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्याच्या खर्चाची बाब म्हणुन भोजन भत्ता,निवास भत्ता,निर्वाह भत्ता,आदी पोटी पुढील प्रमाणे अनुदान निधीची तरतुद करण्यात आली आहे.मुबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई,ठाणे,पुणे,पिंपरी चिंचवड,नागपुर,या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-यांसाठी उपरोक्त बाबींसाठी अनुक्रमे ३२,०००.,२०,०००.,८,०००. असे एकूण ६०,०००/रुपये.महसूल विभागीय व “क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी २८,०००.,१५,०००.,८,०००.असे एकूण ५१,०००/रुपये.आणि उर्वरित ठिकाणी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी २५,०००.,१२,०००.,६,०००.असे एकूण ४३,०००/हजार रुपये.तसेच वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपरोक्त रक्कमेव्यतिरीक्त ५,०००/रुपये व अन्य शाखेतील यांच्यासाठी २,०००/रुपये अधिकची रक्कम शैक्षणीक साहित्य खरेदीसाठी रोख स्वरुपात देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जांचा विहित नमुना व सविस्तर अटी, शर्तींचा तपशिल https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह त्या विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातून निर्गमित करण्यात आलेले आहे. त्या जिल्हयाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष/टपालाद्वारे दिनांक १६ मार्च २०१७ पर्यंत अर्ज दाखल करावेत.त्या त्या जिल्ह्यासाठीही अधिकारी व स्वतंत्र संकेत स्थळ दिलेले आहेत .त्याद्वारे देखील अर्ज करता येईल.जसे नांदेड – बी.एन.वीर,सहा.समाज कल्याण आयुक्त नांदेड व संकेत स्थळ swadhar.swnanded@gmail.com आणि पासवर्ड – Pass@1234 असे आहे.तरी अधिकाधीक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व शिक्षण वंचित राहू नये असे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने (समाज कल्याण) आवाहन केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिएसकेंना आता पाठ्यपुस्तकात स्थान नाही…

News Desk

सीतेला रामाने पळवले, गुजरात बोर्ड

News Desk

सासमीरा इंस्टिट्यूटमध्ये हिंदी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम 

News Desk