HW News Marathi
शिक्षण

मुला-मुलींसाठी विशेष योगाभ्यास वर्गाचे आयोजन

नांदेड :- पतंजलि योग समितीच्यावतीने शाळकरी मुलांसाठी आठ दिवसीय नि:शुल्क योगाभ्यास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ दि.१९ ते २६ मार्च दरम्यान रोज सकाळी ७ ते ८ या वेळेत शहरातील चंदगीराम अँड सन्स येथे ही कार्यशाळा होणार आहे़

शहरातील चंदगीराम अँड सन्स येथे गेल्या ११ वर्षांपासून नि:शुल्क योग वर्ग घेण्यात येतात़ शालेय सत्र संपल्यामुळे आता मुलांसाठी विशेष योगाभ्यास कार्यशाळा घेण्यात येत आहे़ मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धीक व आत्मिक विकास होण्यासाठी मार्गदर्शन तसेच आहार, दिनचर्या, संस्कार व व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त आसन, प्राणायाम, सुक्ष्म व्यायाम, सुर्यनमस्कार, ध्यान असे प्रात्यक्षिक करुन घेतले जाणार आहेत.कार्यशाळा जरी शाळकरी मुलांसाठी असली तरी त्यांच्यासमवेत त्यांचे पालक सहभागी होऊ शकतात़ कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजक तथा जिल्हा प्रभारी अनिल अमृतवार व पतंजली योग समितीने केले आहे़.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार ” योजना.

News Desk

5 मार्चपासून सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा

News Desk