HW News Marathi
शिक्षण

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

उत्तम बाबळे

नांदेड । महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-2017 परीक्षा रविवार 2 एप्रिल 2017 रोजी नांदेड शहरातील 24 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

नांदेड शहरातील विविध 24 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 6 हजार 984 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे, यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पवई आयआयटीत चोरांचा धुमाकूळ 

News Desk

धनगर समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने  बाबरवस्ती शाळेत शालेय वस्तूंचे वाटप 

News Desk

सत्तेत आल्यानंतर जावडेकरांना स्वतःच्याच आश्वासनांचा विसर | काँग्रेस प्रदेश शिक्षक सेल

News Desk
Uncategorized

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज ही स्वायत्त संस्था असून ती भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत आहे. ग्रामीण विकासातील गुणवत्ता कार्यामुळे या संस्थेची ख्याती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरली आहे. ग्रामीण विकास क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनीधी, शिक्षण तज्‍ज्ञ आणि विद्यार्थी यांना आंतरशाखीय विषयातील प्रशिक्षण देणे, संशोधन करणे आणि सल्लामसलत करणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत.

प्रारंभी 1958 मध्ये नॅशनल इन्स्टिट्युट कम्युनिटी डेव्हलपमेंट या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. पुढे 1965 मध्ये संस्थेचे स्थलांतर हैद्राबाद येथील संकुलात करण्यात आले आणि 1977 मध्ये या संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट असे नामकरण करण्यात आले आहे. हैद्रबाद पासून 15 किमी मधील राजेंद्रनगर येथे ही संस्था आहे. या संस्थेने 2008 साली सुवर्ण जयंती साजरी केली. गुवाहाटी, पटणा आणि जयपूर येथे या संस्थेची विभागीय केंद्रे आहेत.

या संस्थेने नुकतीच चौदाव्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल डेव्हलपमेंट या पूर्णवेळ निवासी एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असावेत. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला बसलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा, समूहचर्चा आणि व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल. या आधारे उमेदवारांची अंतिम निवड होईल. लेखी परीक्षा दि. 28 मे, 2017 रोजी बंगळुर, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, दिमापूर, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पटणा, पुणे आणि थिरुवंतपुरम या केंद्रांवर होईल. यापैकी कुठलेही केंद्र रद्द करण्याचा किंवा नवीन केंद्र स्थापन करण्याचा, उमेदवारांना ते बदलून देण्याचा अधिकार संस्था राखून ठेवत आहे. संस्थेत वसतिगृहाची आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार विविध संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे, 2017 अशी आहे.

संस्थेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया संस्थेच्या www.nird.org.in/pgdrdm या संकेतस्थळास भेट द्यावी.

Related posts

लोकसभेच्या निकालानंतर अचानक देशातील जनतेचे “चौकीदार” अदृश्य

News Desk

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk

सोनियांची प्रकृती खालावली

News Desk