HW News Marathi
शिक्षण

देशात दहावीच्या निकालात मुलींची बाजी

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई कडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेला देशभरातून १६.८८ लाख विद्यार्थी बसले होते. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या परीक्षेत देशभरात ८८.६७ % मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८५.३२ टक्के मुले देशात उत्तीर्ण झाली आहेत.

या निकालात प्रखर मित्तल, रिमझिम अगरवाल, नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी उत्कृष्ठ गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी या चौघांनी देशात पहिले येण्याचा मान पटकवलाय. या चारही जणांना ५०० पैकी ४९९ मार्कस मिळाले आहेत. तर दिव्यांग श्रेणीत गुडगावची अनुष्का पांडा देशात पहिली आली आहे.

सीबीएसई दहावीचा निकाल https://cbseresults.nic.in या वेबसाइटवर पाहता येत आहे. यावर्षी १६.८८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या २०१८ च्या दहावी व बारावीच्या संयुक्त परीक्षा जगभरातून २८ लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतल्या ३५ शाळा होणार आंतरराष्ट्रीय

News Desk

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk

हिंदी आणि भारतीय भाषा वाचवणार, प्रकाश जावडेकरांचे आश्वासन

News Desk