HW News Marathi
शिक्षण

महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी आव्हान  

उत्तम बाबळे

नांदेड :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून चालु वर्षात 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेसाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इच्छुक अर्जदारांनी कर्जासाठी स्वत:चा ईमेल वापरुन ऑनलाईन पद्धतीने 16 ऑगस्ट 2017 ते 15 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी 14 ऑक्टोंबर2017 पर्यंत कर्ज मागणी अर्जाची मुळप्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग ग्यानमातासामोर, नांदेड येथे स्वत: सादर करावीत. इतर व्यक्तींकडून अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत, असेही आवाहन येथील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात दहावीच्या निकालात मुलींची बाजी

News Desk

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk