HW News Marathi
शिक्षण

रात्रशाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

मुंबई | मुंबईतील प्रत्येक रात्रशाळेतील १०वी, १२वी त प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव रोजी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते परळ येथे पार पडला. महाराष्ट्र प्रदेश रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, संवादिनी संस्थेचे अरुण लावंड, जयवंत पाटील, एस. वाय. देशपांडे, शिवाजी खैरमोडे, छात्रभारती मुंबईचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह विविध रात्रशाळांमधील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्रशाळा बंद करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी उचललेली पावलं आणि त्यामुळे झालेली वाताहत याविरोधात प्रदीर्घ संघर्ष सुरु आहे. त्याला यश मिळेलच. पण रात्रशाळांची सद्यस्थिती दयनीय आहे. रात्रशाळा अडचणीत आहेत. यासर्वच खडतर परिस्थितीवर मात करत या हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या यशात रात्रशाळा शिक्षकांचेही प्रचंड योगदान आहे, अशा शब्दात आमदार कपिल पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

रात्रशाळांमध्ये गरीब व वंचित विद्यार्थी शिकत असतात. दिवसभर काबाडकष्ट करुन, रात्रीच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे जाण्याची स्वप्न बघतात. अशा विद्यार्थ्यांना कमी वेळेत गोळीबंद शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक आपलं योगदान देतात. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. त्यामुळे रात्रशाळा बंद होता कामा नये, असे मत महाराष्ट्र प्रदेश रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांनी यावेळी मांडले.

गुणवतं विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रदेश रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. संवादिनी संस्थेच्या वतीने रात्रशाळेतील प्रथम विद्यार्थी पंडीत धोंडीबा नामदेव कुंभार पुरस्काराचं प्रमाणपत्र आणि पुस्तक खरेदीसाठी खास कूपन यावेळी गुणवतं विद्यार्थ्यांना देण्यात आले, असे म्हात्रे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संगिता कदम यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मेडशी जिल्हा परिषद शाळेत संगणक व इ लर्निंग लोकार्पण सोहळा

News Desk

महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी आव्हान  

News Desk

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk
मुंबई

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk

मुंबई | ३ जुलै रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील पादचारी पुल कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले मनोज मेहता यांचे उपचारांदरम्यान निधन झाले, ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. तब्बल २७ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.ते पालघरमधील प्रख्यात विकासक होते. राजेश बिल्डर्स या कंपनीद्वारे त्यांनी पालघर, बोईसरमध्ये अनेक गृहसंकुलांची उभारणी केली होती.

३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे अंधेरी-डहाणू मार्गावरील लोकल पकडण्यासाठी अंधेरी स्थानकात आलेले मनोज मेहता अचानक पूल कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल ३ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने, सुदैवाने मोठा अनर्थ टळला होता.

Related posts

केईएमसह नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी दोन वसतिगृह तयार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

२२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी मुंबई मेट्रो बंद असणार, तसेच मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक

swarit

पानपट्यावर चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट विकण्यास बंदी

News Desk