HW News Marathi
शिक्षण

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे  प्रवेश व परीक्षेपासून वंचित ठेवू नये

उत्तम बाबळे

नांदेड:भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षणशुल्क परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१६ – १७ मधील शिक्षण व इतर शुल्काची रक्कममहाविद्यालयास मिळाली नाही.त्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाची शुल्क संगणक प्रणाली सुरु झाल्यावर बँकखात्यावर जमा होणार आहे.विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेशापासून वंचित ठेवू नये. जे विद्यार्थी परीक्षा पात्र झाले आहेत.त्यांचे गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला,तत्समदस्तऐवज अडवू नये. विद्यार्थ्यांना तत्सम दस्तऐवज देण्यास नकार दिल्यास संबंधित महाविद्यालयांविरुद्ध कारवाई केली जाईल,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१६ -१७ मधील नांदेड जिल्हयातील ४५ हजार ७२० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती, फ्रिशीपअर्ज भरले होते. त्यापैकी ३८ हजार १३३ विद्यार्थ्यांचेशिष्यवृत्ती अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.शैक्षणिक वर्ष २०१६ – १७ मधील ७ हजार ४१० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जप्रलंबित आहेत.सद्यस्थितीत संगणक प्रणाली मास्टेक याकंपनीचा करार संपल्यामुळे भारत सरकार शिष्यवृत्तीचेसंकेतस्थळ बंद आहे.शासनाकडून आय.टी.(I.T.)विभागामार्फत Unitied portalविकसित होत आहे. या DBT Portal(Direct benefiet Transfer)द्वारेच ई-स्कॉलरशिप योजना राबविण्यात येणार आहे.

भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा फीयोजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०११ – १२ पासून सामाजिकन्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ई-स्कॉलरशीपप्रणालीची सुरूवात करण्यात आली.

त्याअनुषंगानेशालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन कनिष्ठ, वरिष्ठ,पदवी, पदव्युत्तरइत्यादी अभ्याक्रमास प्रवेश घेणाऱ्या मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित,व्यावसायिक,बिगरव्यावसायिकमहाविद्यालयातील अनु.जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना निर्वाहभत्ताची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेचसंबंधित महाविद्यालयाची शिक्षण फी व इतर फीची रक्कममहाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द

News Desk

रात्रशाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

News Desk

महापुरुषांना विशिष्ठ जातीत बंदिस्त करू नये –  डॉ. कोत्तापल्ले  

News Desk