HW News Marathi
शिक्षण

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

उत्तम बाबळे

नांदेड :- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्च २०१८ च्या परीक्षेपासून शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य व लोककला प्रकारात सहभागासाठी वाढीव गुण देण्यात येणार असून त्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर प्रगटनाद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी व पालक आदींना गुण देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सुचित केले आहे. त्यानुसार संबंधीत मुख्याध्याकांनी मार्च २०१७ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव गुरुवार २० एप्रिल २०१७ पर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावेत. तर संबंधीत मुख्याध्यापकांनी रविवार ३० एप्रिल २०१७ पर्यंत विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करावेत. एखादा विद्यार्थी एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये कलाविषयक व क्रीडा विषयक शिक्षण घेत असल्यास व एकापेक्षा जास्त कला अथवा क्रीडा विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत असल्यास त्याला सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची कमाल मर्यादा २५ गुणांची आहे. याची नोंद घेवून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळांनी याबाबतचा १ मार्च २०१७ च्या शासन निर्णयाची नोंद घेऊन व त्यातील वाढीव गुण देण्याच्या कार्यपद्धतीची नोंद घेवून वेळेत कार्यवाही करावी. कोणताही विद्यार्थी गुणाच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्यावतीने लातूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी केले आहे .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

News Desk

देशात दहावीच्या निकालात मुलींची बाजी

News Desk

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

News Desk