HW News Marathi
मनोरंजन

स्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला महोत्सवाचे आयोजन 

तीन गीत गायन आणि पाच नाटकांची रसिकांसाठी विशेष मेजवानी

उत्तम बाबळे

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रोयोगजीवी कला संकुलातर्फे दि.२४ ते २ ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रीय संगीत एवं नाट्यकला महोत्सवाचे आयोजन कै. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दररोज सांयकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. शैलजा स्वामी यांच्याहस्ते पार पडणार असून अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. पंडित विद्यासागर भूषविणार आहेत.

या उदघाट्न समारंभामध्ये सुप्रसिध्द गोंधळी लोकनायक गुलाबराव कदम यांचे राधाविलास आणि अनिरुध्द वनकर यांचे गायन होणार आहे. त्यानंतर डॉ. मंगेश बनसोडे दिग्दर्शित मुंबई येथील सम्यक ग्रुप “मी लाडाची मैना तुमची” हे नाटक सादर होणार आहे. या उदघाटन समारंभास गुरुद्वारा लंगर साहिबचे जत्थेदार प.पू.संत बाबा बलविंदर सिंगजी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गणेशचंद्र शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टसचे प्र. संचालक डॉ. मंगेश बनसोडे, बापूराव गजभारे हे उपस्थित राहणार आहेत.

हा नाट्य महोत्सव पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कला केंद्र, उदयपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, नांदेड, गुरुद्वारा लंगर साहिब, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दि.२५ जुलै रोजी संगीत विभागातर्फे उप शास्रीय व सुगम गायन सादर होणार असून त्यानंतर एनएसडी, नवी दिल्लीच्या संगीता टिपले लिखित व दिग्दर्शित “ठलवा” हे नाटक चंद्रपूरची लोक जागृती संस्थेतर्फे सादर करण्यात येणार आहे. दि.२६ जुलै रोजी संगीत विभागातर्फे उप शास्रीय व सुगम गायन सादर होणार असून त्यानंतर सार्थक थिएटर ग्रुप, जयपुरचे शाबीर खान दिग्दर्शित “दुधा” हे राजस्थानी नाटक सादर होईल. दि.२८ जुलै रोजी संगीत विभागातर्फे उप शास्रीय व सुगम गायन सादर होणार असून त्यानंतर एनएसडी, नवी दिल्ली येथील कविराज लाईक दिग्दर्शित द परफॉर्मस, उदयपूर प्रस्तुत “मीता की कहाणी” हे नाटक सादर होणार असून दि.०२ ऑगस्ट रोजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर लिखित आणि सौ. शुभांगी शेळके दिग्दर्शित “ओवी गाऊ विज्ञानाची” हे नाटक विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलातर्फे सादर करण्यात येणार आहे.

देशातील विविध लोककलांवर आधारित आधुनिक नाटकांचे प्रयोग या नाट्य महोत्सवामध्ये सादर होणार असून मानवी जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग असलेल्या सामाजिक व सांस्कृतिक धरोहर जोपासणाऱ्या लोककलांचा यामध्ये समावेश आहे. या नाट्य महोत्सवास प्रवेश विनामूल्य असून नाट्यप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा.डॉ. रमजान मुलानी व ललित व प्रोयोगजीवी कला संकुलाचे समन्वयक प्रा. रामचंद्र शेळके यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार | गिरीश महाजन

News Desk

आगमन बाप्पाचे | अगरबत्तीच्या सुगंधाने दरवळल्या बाजारपेठा

swarit

नारळाच्या करंज्या

News Desk