मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता रमेश भाटकर यांचे निधन झाले आहे. भाटकर यांचे दिर्घ अजाराने त्यांचे निधन झाले आहे. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७० वर्षानी त्यांचा मृत्यू झाला आहे. कर्करोगाने आजारी असल्याने त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. रमेश भाटकर आज (४ फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिनी त्यांची निधन झाले. नुकत्याच आलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती.
भाटकर यांनी ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या मालिकातील त्यांची भूमिका सर्वांनाच आवडली होती. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. डॉ काशीनाथ घाणेकर यांच्यानंतर लाल्ल्या ही व्यक्तीरेखा साकारली होती. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते. भाटकर यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रमेश भाटकर यांचा अल्प परिचय
अभिनेते रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या जन्म ३ ऑगस्ट १९४९ रोजी झाला होता. १९७७ मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली.
भाटकर यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.