HW News Marathi
मनोरंजन

चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेत्याला कारावास

नवी दिल्ली | चेक बाऊन्सप्रकरणी बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्याची कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना ही शिक्षा सुनावली आहे. राजपाल यांनी २०१० साली इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते.

परंतु अद्याप राजपाल पैसे परत करत नसल्याने सिंह यांनी राजपाल यांच्या मागे तगादा लावला होता. यामुळे २०१५ साली राजपाल यांनी मुंबईतील अॅक्सिस बँकेचा एक चेक सिंह यांना दिला होता. मात्र तो चेक बाऊन्स झाला. यामुळे सिंह यांनी वकीलाकडून राजपाल यांना नोटीस पाठवली. तरी देखील यादव यांनी कर्ज फेडले नाही.

यामुळे सिंह यांनी नवी दिल्ली येथील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयाने सिंह व राजपाल यांना सामंजस्याने हा वाद सोडवण्याचा अनेकदा सूचना दिल्या होत्या. मात्र, राजपाल यांनी गंभीरपणे न घेता सिंह यांचे कर्ज फेडलेच नाही. यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जे खोटे आहे ते खोटेच आहे

Gauri Tilekar

जाणून घ्या… पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार

News Desk

शाहरुखचा झिरो मोठ्या साईजमध्ये रिलीज

News Desk
महाराष्ट्र

आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात कपात

News Desk

नवी दिल्ली | महागाई वाढत असल्यामुळे जनता दिवसेंदिवस त्रस्त आहे. त्यातच सामान्य जनतेला आज एक आनंद वार्ता आहे. आजपासून सरकारने अनुदानित, विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे देशातील सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात साडे सहा रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर १३३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

शनिवार पासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) ने याबाबतची माहिती शुक्रवारी दिली होती. अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्यानंतर दिल्लीत १४.२ किलोच्या गॅसची किंमत आता ५०७.४२ रुपयांवरून ५००.९० रुपयांवर आली आहे.

Related posts

अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम – आशिष शेलार

News Desk

MPSC परीक्षा रद्द करुन सरकारने एकाच जातीचा विचार केला, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

Aprna