नवी दिल्ली | चित्रपट पाकीजा मधील अभिनेत्री गीता कपूर यांचे शनिवार सकाळी ९ वाजता मुंबईच्या एका वृद्धाश्रमात निधन झाले. कमाल अमरोहीच्या पाकीजा चित्रपटात गीता यांनी राजकुमार यांच्या दुस-या पत्नीची भुमिका केली होती. प्रोड्यूसर अशोक पंडित यांनी गीता कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोराला दिला आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटर हॅंडल वर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडीओमध्ये गीता कपूर यांचा मृतदेह दिसत आहे.
Standing besides the dead body of Actress #GeetaKapoor 57 who was abandoned by her kids in #SRVHospital a year back breathed her last at a suburban Old age home today morning. We tried our best to keep her healthy but her wait for her Son&daughter made her weaker day by day. #RIP pic.twitter.com/yCChdzeSEt
— Ashoke Pandit (@ashokepandit) May 26, 2018
अशोक पंडित यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले आहे. मी सध्या ५७ वर्षीय गीता कपूर यांच्या पार्थिवा जवळ उभा आहे, त्यांना एक वर्षापूर्वी त्यांच्या एसआरवी हॉस्पीटलमध्ये सोडले होते. वृद्धाश्रमामध्ये आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आम्ही त्यांची काळजी घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु मुलांची त्या नेहमी वाट पाहत असत त्यामुळे त्या दिवसेंदिवस कमजोर होत गेल्या.
Standing besides the dead body of Actress #GeetaKapoor 57 who was abandoned by her kids in #SRVHospital a year back breathed her last at a suburban Old age home today morning. We tried our best to keep her healthy but her wait for her Son&daughter made her weaker day by day. #RIP pic.twitter.com/yCChdzeSEt
— Ashoke Pandit (@ashokepandit) May 26, 2018
एका रिपोर्ट नुसार अशोक पंडित म्हणालेत, गेल्या एक वर्षापासून त्या आपल्या मुलांची वाट पाहत होत्या. परंतु त्यांना कुणीही भेटायला आले नाही. गेल्या शनिवारी आम्ही त्यांना आनंदी ठेवण्यासाठी एक ग्रॅंड ब्रेकफास्ट अरेंज केला होता. त्या ठिक होत्या परंतु त्या आनंदी नव्हत्या. कारण त्या आपल्या मुलांची वाट शेवटपर्यंत पाहत होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.