मुंबई | ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट ‘प्रपोगंडा आणि वल्गर’, अशी टीका इफ्फी फेस्टिव्हलमध्ये (IFFI) दाखवण्यात आल्यामुळे इफ्फी फेस्टिव्हलचे मुख्य ज्युरी आणि आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट गोव्यात झालेल्या ५३व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॅपिड यांनी चित्रपटावर टीका करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत. तर काही अभिनेता आणि अभिनेत्रींना लॅपिड यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे मनोरंजन विश्वास फळी निर्माण झाला आहे.
दरम्यान, अभिनेता अनुपम खेर, चित्रपट निर्माते अशोक पंडित, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री विवेक आणि अभिनेता अग्निहोत्री, चिन्मय मांडलेकर यांन नदाव यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर स्वरा भास्कर आणि प्रकाश राज या कलाकारांनी इस्त्रायली दिग्दर्शकाच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे. लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात कामकरणारे अभिनेता अनुपम खेर यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. अनुपम खेर ट्वीटमध्ये म्हणाले, “खोट्याची उंची कितीही उंच असली तरी..सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते”, केले आहे.
झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो..
सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है.. pic.twitter.com/OfOiFgkKtD— Anupam Kher (@AnupamPKher) November 28, 2022
यानंतर दिग्दर्शित विवेक अग्निहोत्री ट्वीट करत लॅपिड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, “हे सत्य लोकांकडून खूप खोटे असते. काही वदवून घेऊ शकतात”, असे ट्वीट केले आहे.
GM.
Truth is the most dangerous thing. It can make people lie. #CreativeConsciousness
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 29, 2022
अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात केलेले वक्तव्याचे समर्थन करत ट्वीट केले आहे. स्वरा भास्करने लॅपिड यांच्या वक्तव्याची बातमी शेअर करत “जगासमोर सत्य आले आहे”, असे ट्वीट केले आहे.
Apparently it’s pretty clear to the world ..https://t.co/VQGH6eKcj6
— Swara Bhasker (@ReallySwara) November 28, 2022
स्वरा भास्करसोबत अभिनेता प्रकाश राज यांनी देखील लॅपिड यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. अभिनेता प्रकाश राज यांनी एनडीटीव्हीची द काश्मीर फाइल्ससंदर्भातील लॅपिडची बातमी शेअर करत म्हणाले, “सिनेमा द्वेषाचे बीज पेरतो आहे.”
SHAME is Official now…#justasking https://t.co/nxq5yoJRe8
— Prakash Raj (@prakashraaj) November 28, 2022
नदाव लॅपिड नेमके काय म्हणाले
गोव्यात झालेल्या ५३व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या समारोपावेळी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड म्हणाले, ” ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपटात फेस्टिव्हलमध्ये पाहून आश्चर्य वाटले. कारण हा चित्रपट फेस्टिव्हलमध्ये समावेश करून घेणे योग्य नव्हते. हा चित्रपट ‘वल्गर आणि प्रोपगँडा’ सिनेमा आहे, असे मत त्यांनी मांडले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.