HW News Marathi
मनोरंजन

अरबाजला हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याचा पोलिसांना संशय

ठाणे | अभिनेता अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्या कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आरोपी सोनू जालानने केल्याचा पोलिसांना संशय आहे. बुधवारी ठाणे न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी रविवारपर्यंत वाढवली. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाला क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने आतापर्यंत टोळीतील आठ आरोपींना अटक केली.

आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोनू जालानचे बॉलिवूड जगताशी असलेले संबंध तपासादरम्यान उघडकीस आले. अभिनेता सलमान खानचे वडील तथा प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान हेदेखील सोनूकडे नियमित सट्टा लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, तसा पुरावा मिळाला नसल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी सांगितले. तर अरबाज खान हा सोनू जालानच्या काही महत्त्वाच्या ग्राहकांपैकी एक होता. तो सोनूकडे नियमित सट्टा खेळायचा. पैशांचा हिशेब ते अधूनमधून करायचे.

सट्ट्याचा हिशेब बरेच दिवसांपासून केला नसल्याने मध्यंतरी अरबाजचा सोनूशी वाद झाला.अखेर, हा विषय संपवण्यासाठी तो सोनू जालानच्या कार्यालयावर गेला. सोनुने सुमारे पावणेतीन कोटी घेणे असल्याचे सांगितले. एवढी रक्कम हरलोच नसल्याचे अरबाजने त्याला सांगितले. यातून दोघांमध्ये खटके उडाले. काही दिवसांनी हा वाद मिटला. मात्र, त्या काळात सोनूच्या प्रत्येक सूचनेचे अरबाज पालन करायचा. त्यामुळे त्याला सोनूने हनी ट्रॅपमध्ये अडकवले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

Gauri Tilekar

#GaneshaChaturthi : बाप्पाला निरोप देताना भरतीच्या वेळ पाहण्याचे पोलिसांचे आवाहन

News Desk

विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला | तावडे

News Desk
देश / विदेश

इस्लामविरोधी ट्वीटमुळे गमावावी लागली नोकरी

News Desk

दुबई | अतुल कोचर या भारतीय वंशाच्या एका शेफला इस्लामविरोधी ट्वीटमुळे आपली नोकरी गमावावी लागली आहे. प्रियंका चोप्राच्या ‘क्वॉन्टिको’ सीरिजमध्ये भारतीय देशभक्तांना दहशतवाद्यांच्या भूमिकेत दाखवले असल्यामुळे अतुल कोचर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून क्वॉन्टीकोवर टीका केली होती.

अतुल यांनी ट्वीट मध्ये म्हटल होते की, “हे पाहून मला खूप दु:ख होत आहे की प्रियंकाने हिंदूंच्या भावनांचा आदर केला नाही, जे 2000 सालापूर्वीपासून इस्लामी दहशतवादाचे शिकार बनले आहेत.” मात्र आपल्या ट्वीटमुळे वाद होत आहेत हे कळताच कोचर यांनी आपले ट्वीट डिलीट केले पण तोपर्यंत त्यांना आपली नोकरी गमावावी लागली. यानंतर लगेचच त्यांनी ट्वीटवर माफी मागितली आहे.

अतुल कोचर यांच्या ट्वीटमुळे वादाला तोंड फुटले तसंच त्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली .त्यानंतर शेफ अतुल कोचर यांना रंगमहल रेस्टॉरंटने करार संपवून कामावरुन काढून टाकले आहे. निराश झालेल्या अतुल कोचर यांनी केलेल्या ट्वीटबद्दल माफी मागत आपल्या विधानामुळे हॉटेल प्रशासनाला झालेल्या त्रासाला आपण जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Related posts

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडणार, भाजपची अग्निपरीक्षा

News Desk

नोटबंदीनंतर देखील निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर !

News Desk

राज ठाकरे यांची मागणी चुकीची | लोकजनशक्ती पार्टी

News Desk