HW News Marathi
मनोरंजन

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून मनमोहक डुडल

मुंबई | गुगल हे नेहमीच जगभरातील दिग्गज व्यक्तींच्या कार्याला डुडलच्या माध्यमातून सलाम करत असते. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून त्याबाबत माहिती देत असते. गुगलने आज (१४ फेब्रुवारी) एक खास लक्षवेधी असे डुडल तयार केले आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री मधुबाला यांची आज ८६ वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने मधुबाला यांचे मनमोहक डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे.

हिंदी सिनेसृष्टीत मधुबाला यांनी त्यांच्या १० वर्षांच्या फिल्मी कारकर्दीत प्रेक्षकांना लावलेले वेड आजतागायत कायम आहे. अभिनय सम्राट दिलीप कुमारपासून तर गायक किशोर कुमारपर्यंत सगळेच त्यांच्यावर फिदा होते. गुगलने एक खास डुडल तयार करून मधुबाला यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने मधुबाला यांचे नृत्य करत असतानाचे खास डुडल तयार केले आहे.

मधुबाला यांचा अल्प परिचय

मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९९३ मध्ये झाला. मधुबाला यांना बेबी मुमताज या म्हणून ओळखले जायचे. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनी बेबी मुमताजचे मधुबाला असे नामकरण केले होते. सुशीलाराणी पटेल यांच्याकडूनच मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे घेतले. मधुबाला यांना एकूण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला यांच्यावर त्यांच्या वडिलांचा प्रचंड पगडा होता. मधुबाला या खूप भावनिक होत्या. इतक्या मोठ्या अभिनेत्री असूनही वडिलांच्या मधुबाला कधीच कोणत्याही पार्टी किंवा प्रीमिअरमध्ये दिसल्या नाहीत. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चॉकलेट गिफ्टवाली दिवाळी

swarit

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

News Desk

Kumbh Mela 2019 | पहा कुंभ मेळ्यातील Tent City

Atul Chavan