HW News Marathi
मनोरंजन

नागपूरकरांच्या प्रेमाने भारावले बिग बी

मुंबई | ‘नागपूरकरांनी दिलेल्या प्रेमासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन’, असे ट्वीट करत महानायक अमिताभ बच्चन यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात आहेत. नागपूर विमानतळावरचे दोन फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनीच ते नागपूरात दाखल झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘झुंड’ या आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटासह नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. त्याचप्रमाणेया चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिकेमुळे निश्चितच प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk

तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे?

News Desk

#KaderKhan : सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला | विनोद तावडे

News Desk