HW News Marathi
मनोरंजन

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | ‘बिग बॉस’च्या अकराव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने आज (५ फेब्रुवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिल्पाने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत राजकारणात प्रवेश केला आहे. “काँग्रेसने इतके वर्ष देश चालवला आहे, आणि काँग्रेस पक्षच देशासाठी काही तरी करू शकतो म्हणून व राहुल गांधी पंतप्रधान व्हावे. ही इच्छा व्यक्त करत शिल्पा शिंदे यांनी पक्ष प्रवेश करत आहे असे सांगत पक्ष प्रवेश केला आहे.”

 

तसेच मनसेने फक्त मराठीचा मुद्दा घेतला होता. काँग्रेसने कोणत्या जातीच राजकारण केले नाही. माझ्या बाबतीत तसेच झाले होते. मला इंडस्ट्रीत काही अडचणी आल्या. तेव्हा मनसेने मराठी मुलगी म्हणून पाठिंबा दिला. परंतु काँग्रेसने तस कधी केले नाही, काँग्रेस नेहमी सर्वांचा पाठी उभी राहते. शिल्पा शिंदे नंतर कोमेडिअन कृष्णा आणि अभिनेत्री अमिषा पटेल हे देखील काँग्रेसमध्ये येण्याचा वाटेवर असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

शिल्पा शिंदेचा अल्प परिचय

शिल्पा शिंदेचा जन्म २८ ऑगस्ट १९७७ रोजी महाराष्ट्रातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिल्पाचे वडील डॉ. सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. तर तिची आई गीता शिंदे या गृहिणी आहेत. शिल्पाला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. शिल्पाने के. सी. कॉलेजमधून मानसशास्त्रचे शिक्षण घेतले. मात्र पदवीपर्यतचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.

शिल्पा शिंदेने १९९९ मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र २०१४ मध्ये आलेल्या ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेने शिल्पाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. यामध्ये तिने अंगुरी भाभीची व्यक्तीरेखा साकारली होती. शिल्पाने २०१६ च्या सुरुवातीला मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर २०१७ मध्ये तिने बिग बॉस ११ मध्ये सहभाग घेतला. तिने हा रिअ‍ॅलिटी शो जिंकला होता. आयपीएलच्या मागच्या पर्वत सुनील ग्रोव्हरच्या साथीने तिने कॉमेडी पेरेडी सादर केली आहे. तर सलमान खानने तिला त्याच्या आगामी भारत ह्या सिनेमात महत्वाची भूमिका देऊ केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार ?

News Desk

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

Kumbh Mela 2019 | मोदीजी रामाला एक घरही नाही देऊ शकले ?

Atul Chavan