HW News Marathi
मनोरंजन

नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ !

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. यानंतर २३ मे रोजी निकाल लागणार असून तत्पूर्वी निकालांचे अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल काल (१९ मे) जाहीर झाले आहेत. विवध एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सरकार येरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलच्या निकालानंतर तर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसच पडला. सोशल मीडियावर विरोधकांची खिल्ली उजविणार अनेक मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. यात मीम्स अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या एक्झिट पोलच्या मीम्सची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे मीम्स खुद विवेकने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहे. विवेकने ट्वीट शेअर केल्यानंतर बॉलिवूड काय पण सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण विवकने शेअर केलेले हे मीन्स एक्झिट पोलचे नसून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची खिल्ली उडविणारे आहे. विवेकने हे मीन्स शेअर करत म्हटले की, “हाहाहा..क्रियेटीव्ह ! नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ ” अशी कॅप्शन दिली आहे. या मीम्समधील ओपिनियन पोलमध्ये ऐश्वर्यासोबत अभिनेता सलमान खान आहे. एक्झिट पोलमध्ये ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत तर रिझल्टमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत आहे.

https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392

विवेकने हे मीम शेअर करताना त्यासोबत लॉफिंग इमोजी पोस्ट केले आहेत. विवेकने हे मीम्सद्वारे ऐश्वर्या राय बच्चनची खिल्ली उडविण्यासाठी हे मीम का निवडले, असे अनेक प्रश्न चाहात्यांना पडले आहे. या मीम्सने विवेक पुन्हा चर्चेत आला असून यावर ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाताळ स्पेशल डेझर्ट

News Desk

समाजात विष पेरले गेले !

News Desk

Gandhi Jayanti : राजघाटावर महात्मा गांधी यांना मोदींनी वाहिली आदरांजली

swarit