HW News Marathi
मनोरंजन

रणवीर-दीपिकाच्या विवाहावर शीख समुदाय नाराज

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा इटलीमध्ये थाटामाटात शाही विवाह इटलीतील लेक कोमो येथे सोहळा पार पडला. या दोन्ही बॉलिवूड कलाकाराचा विवाह १४ आणि १५ नोव्हेंबरला संपन्न झाला असून संपूर्ण देशभरात यांच्या विवाहाच्या चर्चा सुरू होत्या. हा विवाह सोहळा पारंपरिक कोंकणी आणि सिंधी पध्दतीने पार पडला आहे. परंतु रणवीर आणि दीपिका यांच्या विवाहावर शीख समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे.

रणवीर दीपिकाचा विवाहसोहळा १४ तारखेला कोंकणी पद्धतीने तर १५ तारखेला आनंद कारज पद्धतीने लग्नाचे विधी पार पडले. या विवाह सोहळ्यात आनंद कारज या पद्धतीनुसार रणवीर- दीपिकाला गुरुद्वारामध्ये जाणे भाग होते. परंतु त्यांनी तसे न करता विवाहस्थळी गुरु ग्रंथ साहिब आणले. शीख धर्मीयांकडून पवित्र मानले जाणारे गुरु ग्रंथ साहिब गुरुद्वाराबाहेर नेले जात नाही. त्यामुळे शीख समुदाय नाराज झाला असून त्यांनी या दोघांविरोधात अकाल तख्तकडे तक्रार केली आहे. यावर आता दीपिका-रणवीर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या विवाहाचे पहिले रिसेप्शन होणार आहे. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. तर २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आलिया भट्टचा न्यूड फोटो व्हायरल!!!

News Desk

नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी द्यावी | कंगना रणावत

swarit

बिग बींचा शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News Desk
राजकारण

मालेगाव बॉम्बस्फोट : पुरोहित यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाने सुनावणी रोखण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असल्यामुळे आम्ही दखल देणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालय म्हटले आहे. या पुरोहित यांनी याचिकेत म्हटले की, माझ्या विरोधात कोणत्याही वैध परवानगीशिवाय खटला चालवला जात असल्याबद्दल पुरोहितने म्हणाले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित प्रसाद, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चर्तुवेदी यांच्यासह सर्व ७ जणांवर दहशतवादी कृत्य करणे, हत्या आणि अन्य गुन्ह्यांखाली आरोप निश्चित केले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला सुरू केला आहे.

याआधी एनआयएच्या विशेष न्यायालयाने पुरोहित याची आरोप निश्चितीस स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली होती. तसेच ३० ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयानेही आरोपी पुरोहित आणि अन्य व्यक्तींविरोधात आरोप निश्चितीस स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयास सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर सुमारे शंभर जण जखमी झाले होते.

 

Related posts

“मोदी स्वतंत्र भारताला मिळालेले सर्वात वाईट पंतप्रधान”

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता! – देवेंद्र फडणवीस

Aprna

भाजपकडून युतीसाठी एक पाऊल पुढे

News Desk