चंदगडच्या रांगड्या,तांबड्या मातीत आपल्या लेखणीच्या माध्यमातून विचारांची अंकुरं फुलवुन आपल्या तालुक्याचं स्वामित्व टिकवून ठेवणारे थोर साहित्यिक ‘स्वामीकार’ पद्मश्री ‘रणजित देसाई’ यांचा आज 26 वा स्मृतिदिन…..
तालुक्यातल्या कित्येक जणांना आजही ते समजले नसतील किंवा त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न हि केला नसेल….पण लेखणी कागदावर उमटू लागली की की हळूहळू स्वतःची प्रतिमा तयार होत जाते आणि मग त्या लेखणीची सगळी दुनिया गुलाम होते..नतमस्तक होते हे या महान लेखकाने दाखवून दिलं…..आजही त्यांचा वाडा त्यांचा कार्याची साक्ष देत उभा आहे….अगदी शेम्बड्या पोरांपासून ते थोरामोठ्यापर्यंत सगळ्यांनी समजून घ्यावेत असे साहित्यिक…..
कोवाड ला कॉलेज ला जात असताना बाजूलाच असणाऱ्या त्यांच्या वाड्याविषयी नेहमीच कुतुहुल मनात दाटलेल असायचं कारण याच वाड्यात जेष्ठ आणि दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या भालु सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं….वाडा सिनेमात पहिला होता त्यामुळे आतमध्ये जाऊन पाहावा अशी नेहमीच इच्छा मानत दाटलेली असायची….
‘स्वामी’ कादंबरी लिहून या कादंबरीच्या माध्यमातून चंदगडच्या समृद्ध लेखणीची ताकद अटकेपार नेणारा हा लेखक याच्या घराची रचना आणि पद्धत कशी असेल पाहिलं पाहिजे असे प्रश्न राहून राहुन मनात यायचे….दीड वर्ष मला आत जाणं जमलंच नाही बाहेरून वारंवार नजर फिरवून समोरून निघून जायचो बाजूलाच वळणावर असणार मंदिर आणि त्याला लागून उभा असणारा अगदी जुन्या रचनेचा त्यांचा वाडा हे चित्रच अविस्मरणीय आहे…..पण शेवटी मित्रांच्या साथीने या वाड्यात मी प्रवेश मिळवला….आत गेल्याबरोबर जाणवलं की वाड्याच्या भिंती त्यांच्या व्यथा प्रत्येकाला ऐकवण्याचा प्रयत्न करतात….
पण इथे कोणी ऐकणारा माणूस त्यांना आजपर्यंत भेटलेला नाही….पुस्तकांची ओळख करून देणार त्यांचं भांडार जणू त्यांच्या कार्याची ओळख करून देत असत…..पण आजच्याच दिवशी त्यांची आठवण व्हावी हे दुर्दैव…….आज मुद्दाम हुन मी बऱ्याच मुंबईतल्या जेष्ठ लोकांना विचारलं तुम्हाला रणजित देसाई माहित आहेत का??तर मला उत्तर मिळत गेली हो माहित आहे त्यांची स्वामी कादंबरी मी वाचलेली आहे पण वाईट या गोष्टीच वाटत की त्यांच्याच लेखणीतून समृद्ध झालेली ‘स्वामी’ कादंबरी आमच्याच तालुक्यातल्या मुलांना कधी वाचवीशी वाटली नाही काही तरुण आहेत जे या वाचन आणि साहित्य चळवळीसाठी अहोरात्र झटत आहेत…पण आज गरज आहे ती रणजित देसाई या साहित्यिकाची ओळख करून देण्याची…..
वर्षभर त्यांच्याविषयी चर्चा न करणारी मंडळी आज नक्की गोडवे गातील अगदी मीही……पण त्यांची लेखन परंपरा आज तालुक्यात पुन्हा एकदा रुजवून नव्या विचारांची अंकुरं खरंच उमलतील का हे पाहणं आणि यावर विचार करण तितकंच महत्वाचं आहे………त्यांनी अनेक पुस्तक लिहिली त्यापैकी स्वामी आणि श्रीमानयोगी हि कादंबरी हि साहित्यातली अजरामर राहिली रणजीतदादानी तांबड्या मातीतली परंपरा महाराष्ट्रभर पोचवण्याबरोबरच अगदी बाहेर सुद्धा पोचवण्याच काम केलं….शब्दांची ताकद कोणी हिसकावून घेऊ शकत नाही पण शब्दच लिहीणार्या माणसांच्या आठवणी जर लुप्त होत असतील तर हे फार भयंकर आहे……
त्यांच्या कोवाड गावी असणाऱ्या वाड्याची डागडुजी करून अखंड साहित्याचा गड आणि त्यांचं स्मारक तालुक्याच्यावतीने जरी आपण उभारू शकलो तरी पुष्कळ आहे….बाकी असो मला नेमकं काय बोलायचं आहे हे जरी समजलं तरी भरपूर आहे…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.