HW News Marathi
मनोरंजन

आपल्या डोळ्यांची काळजी व्हॉट्सअॅप घेणार ?

मुंबई | तंत्रज्ञात प्रगती झाल्यानंतर रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या व्हॉट्सअॅपने आपल्या यूजरच्या डोळ्यांच्या काळजीसाठी नवीन फिचर आणण्याची तयारी केली आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून डार्क मोड फीचरची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. या नव्या अॅपच्या मदतीने मोबाईलमधील लाईट कमी होऊन यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.

लवकरच व्हॉट्सअॅप आपल्या यूजरसाठी आणखी एक अपडेट घेऊन येत आहे. WABetaInfo च्या वृत्तानुसार नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला ‘डार्क मोड’ हा पर्याय दिसणार आहे. यावर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅप हे फीचर व्हॉट्सअॅप घेऊन येण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी यूट्युब, ट्विटर, डिस्कोर्ड आणि रेडडिटसारख्या अॅप्समध्ये ‘डार्क मोड’चा पर्याय देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅपकडून डार्क मोड फीचरवर काम सुरू आहे. आपल्या नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप हे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच अॅन्ड्रॉई़ड फोन, आयफोन एक्समध्ये हे नवे फीचर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीचा बायोपिक वादाच्या भौऱ्यात

News Desk

यंदाच्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या ही विशेष भेट

swarit

“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा” संभाजीराजेंचा निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा

Aprna