HW News Marathi
मनोरंजन

गुडी उभी दारात, आरोग्य येई घरात

उत्सव आणि उत्साह यांच नातं खूपच जुनं आहे. कदाचित उत्साह याच शब्दातूनच उत्सव हा शब्द तयार झाला असावा, असं वाटावं एवढं हे नातं घट्ट आहे. त्यातलाच एक सण म्हणजे गुढीपाडवा ! 1 जानेवारीला नवीन वर्षानिमित्त आपण काही सकंल्प घेतलेले असतात ते अजून पुर्णत्वास नेण्याची प्रोसेस सुरू केलेली नसेल तर आपल्या हया नवीन वर्षानिमित्त अवश्य धरलेले संकल्प सिध्दिस नेण्याचा यत्न गुडीपाडव्यापासून करण्यास हरकत नसावी….साढेतीन मुहूर्तपैकीचा एक मुहूर्त., याच्यापेक्षा शुभदिवस शोधून सापडणार नाही.

पानगळीचे थंड मोठया रात्रींचे दिवस मागे पडतात. फाल्गुनातल्या रंगाची उधळण रगंते आणि सरायला लागते तोच गुढीपाडवा येतो, जिवनातलं चैतन्य सदैव बहरत राहो हा संदेश घेवून आपल्या घरावर उंच उभी राहते…आणि म्हणते आता प्रांरभ चैत्राचा …म्हणजेच चैतन्याचा ! चैत्र महिना म्हणजे चैतन्याचा झरा, जीवनाचा प्रवाह वृक्षांना पुन्हा पालवी येते आसमंतात गुलमोहर, पळस, आरग्वध रंगाची उधळण करु लागतात . चैत्र महिन्याचा प्रारंभ होताच नववर्षाचे आगमन होते आणि या नववर्षाचे स्वागत आपण दारात गुडी उभारुन करतो. किती सुंदर आणि अर्थपुर्ण आपल्या परंपरा नवीन सुरु होणारी काम आवर्जुन या दिवशी आपण सुरू करतो.

आपल्या प्राचीन परंपरा, जगावेगळे शास्त्रपुराण हाच भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा होय. यामुळे संपुर्ण विश्वात भारताला वेगळे स्थान आहे, याच शास्त्राचा एक भाग म्हणजे आयुर्वेद होय , चैत्र महिन्याची सुरवात होताच उन्हाळयाची तीव्रता प्रखरतेने जाणवायला लागते, सुर्यप्रकाश तिक्ष्ण असतो, वातवावरण उष्ण असते, वसंतानंतर ग्रीष्माची ही चाहुल असते, हिवाळयातील गारव्यामुळे शरीरात कफाचे प्राबल्य झालेले असते, त्यात आयुर्वेदिक प्रचकर्म शोधनाद्वारे बाहेर काढण्याचा हा काळ आहे, सोबतच शमन उपचार देखील आवश्यक असतात, या दृष्टीने गुडीपाडव्याच्या वेळी सर्वांनी कडुनिंबाचा पाला खाणे शास्त्रकारांनी आवश्यक असे मानले आहे. म्हणूनच एरवी दुर्लक्षित असलेला कडुनिंब पण त्याचा उग्र मधुर वासाच्या मोहराचा देवाला नैवेद्य दाखवितात, हल्ली लोक केवळ शास्त्र म्हणून एक पान खातात परंतु या काळात उष्णता शमन, कफनाशन असे कडुनिंब पाने खाणे हे आरोग्य कारक होय, खरे तर प्रत्येकाने स्वास्थ टिकविणे ही आज काळाची गरज आहे. आपले सगळे सणवार त्याला जोडून असणारे रिवाज , सणांना करण्यांचे पदार्थ याची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे, परंतु आज ते सर्व नितीनियम गाठोडयात बांधून अडगळीच्या खोलीत जतन करुन ठेवले आहेत.

धार्मिक प्रथा पाळावयाच्या पुरते गाठोडे थोडे सैल करतो, परत गच्च बांधून वरच्या माळयात टाकतो, नेमकं त्यांच्या पाठीमागंच आरोग्य शास्त्र आपल्याला समजत नाही, एकीकडे आरोग्य प्राप्तीसाठी आपली वाटेल ती करुन घ्यायची तयारी असते, तर जो पर्यंत आपल्याला प्रत्येक परंपरा पध्दती या निर्माण करण्यामागे उद्देश लक्षात येणार नाही तो पर्यंत ती धुडकावून लावण्याचीच आपली मनोवृत्ती असते, ती बदलावयला हवी. वर्षभर सणांच्या निमित्ताने ज्या काही रुढी परंपरा असतात त्यात संक्रांतीला तीळगुळ, रंगपंचमीला गारवा-आनंद देणारे रंग खेळणे, चार्तुमासाला उपवास , दिवाळीला अभ्यंग, आणि गुडी पाडव्याला कडुनिंब खाण्याची पद्धत इत्यादी. सर्व काही ऋतुमानांनुसार आपल्या आहारविहारात बदल सुचित करण्यासाठी आरोग्याच्या हितासाठी निर्माण केलेले हे सर्व रितीरिवाज !

गुढीला साखरेचे हार घालतो आपण तेव्हा आपल्यालाही प्रश्न पडतोच की साखरेचा इतका गोडवा असताना कडूलिबांची कडवट चव कशाला हवी सोबत ….? छान श्रीखंड – पुरीचा नैवद्य असताना कशाला सकाळी चावून चावून खायची ती कडुलिंबाची पानं …..? पण यातच आरोग्याचं आणि जिवनाचं देखील सार लपून आहे….एकतर कडवट चव चाखल्या शिवाय साखरेच्या गोडीचं अप्रुप वाटत नाही आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य चांगल ठेवायचं तर वेळच्या वेळी प्यायलाच हवे काही कडू घोट..

काही ठिकाणी मंदिरांमध्ये तिर्थरुपात कडुनिंब देण्याची रित असते, त्यामध्ये धने, जिरे, हिंग, गुळ, चिंच इत्यादी घटकद्रव्ये असतात . हे सर्व द्रव्ये शित असून अग्नीदिप्त करणारे, पित्तशामक आरोग्याचे वर्धन करणारे असतात,

बताशे सुध्दा गुणधर्माने शित असतात, उन्हाळयात शरबत – पन्हे यामध्ये बताशाचाच वापर करायला हवा हिच प्रेरणा कदाचित पाडव्याच्या गुडीला बताशाचा हार घालण्याच्या मागे असावी. वारंवार कोल्डड्रिक्स सारखे रासायनिक घटकद्रव्यांनी युक्त पेय कोरडया घशात रिचविण्याऐवजी लोकांनी उन्हाळयात धने व जि­रयाचे शरबत बताशे घालून नियमित घ्यावे. कारण कोल्डड्रिंक्समुळे तहान विझण्याऐवजी घसा अधिकच कोरडा होतो, शरीराची होणारी लाहीलाही काही थांबत नाही उलट मळमळ होणे, उलटया होणे इत्याइी पित्ताची लक्षणे उद्भवणे ही शक्यताच अधिक असते, रखरखत्या उन्हात खरेतर मनाला तृप्त करणारे, शरीराला गारवा देणारे पेय जसे कैरीचे पन्हे, कोकम शरबत, ताज्या फळांचा रस, ताजे गोड ताक, वाळयाचे शरबत, नारळ पाणी तसेच गुलकंद, मोरावळा अशी एकंदरीत शितपदार्थांची योजना हवी.

गुडीपाडव्याला कडुनिंब खाण्याची पध्दत ही आयुर्वेद शास्त्रास संमत अशीच आहे, परंतु पाडव्याच्या दिवशी कडुनिंब खायचा तो एक दिवसापुरताच नाही, वसंत ऋतु नतंर उन्हाळयात उपयुक्त असा कडुनिंब युक्त पित्तशामक आरोग्य दायक मेवा आपण नियमित सेवन केल्यास आपणास उन्हाळयाचे विकार उद्भवणार नाही . यामध्येच कडुलिंब आवळकाठी, जिरा, धने, हळद ,ओवा, मेथी ,बाळहिरडे, काळेमिठ, मनुक्के इत्यादी पाचक अशी द्रव्ये होय. ही भाजून याचें भरड चुर्ण करावे हा आरोग्यवर्धक मेवा तुम्ही घरच्या घरी बनवु शकता, रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा उपाशीपोटी सेवन करावे. यामुळे पित्तसंबंधित कोणतेही विकार होणार नाही आणि संपुर्ण वर्षभर आरोग्य टिकून राहील…..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार

News Desk

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar

गणेशोत्सव २०१८ | लालबागच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

News Desk