HW Marathi
मनोरंजन

बॉलिवूडच्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानचा आज ५३ वा वाढदिवस आहे. शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला ताज मोहम्मद खान आणि लतीफ फातिमा यांच्या कुटुंबात झाला. शारुखनचे बालपण आपल्या आजीजवळ मंगळुरूमध्ये गेले. यानंतर  शाहरुख दिल्लीत त्याच्या आई-वडिलांकडे आला. शाहरुखची आई मूळ हैदराबादची असून त्याचे वडील हे मूळचे पेशावरचे आहेत. शाहरुख १५ वर्षांचा असताना त्याच्या वडीलचे कॅन्सरने निधन झाले.

लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या किंग खानने आपल्या कामाची सुरुवात टीव्ही सीरियल मधून केली. त्याने १९८८ मध्ये ‘फौजी’ ही पहिली सीरियल केला. त्यानंतर सर्कस सीरियल केले आणि हेमा मालिनींनी शाहरुखला त्यांच्या आशियाना या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख दिल्लीत शिफ्ट झाला. आशियाना सिनेमातील काम लोकांना आवडल्यानंतर खऱ्या अर्थाने शाहरुख खान बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. मग शारुखानला  यश राज चोप्राचे डर ,बाजीगर अशा एका पाठोपाठ एक चित्रपटात काम मिळाले.

यश राज यांचा डर या  चित्रपटात शाहरुख खानने व्हिलनचे काम केले. शाहरुख खानने व्हिलनचे काम करून देखील प्रक्षेकांची मने जिंकली. त्याच्या या भूमिकेसाठी शाहरुख खानला बेस्ट व्हिलन पुरस्कार मिळाले. व्हिलनची छाप शाहरुख खानने सोडलीच मात्र त्याने दिल तो पागल है, दिल से, वीर झारा, या चित्रपटांमध्ये अतिशय लोकप्रियता मिळवली. म्हणून त्यानंतर शाहरुख किंग ऑफ रोमांस म्हणून ओळखला जाऊ लागला. यश राजच्या चित्रपटांसोबत आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मोहब्बतें’, ‘रब ने बन दी जोडी’ या चित्रपटानेही शाहरुख खानला यशाच्या उंचीला गाठले. देवदास (२००२) मे एक व्यसनी, स्वदेश (२००४) में एक नासा वैज्ञानिक, चक दे इंडिया (२००७) में हॉकी प्रशिक्षक, माय नेम इज खान (२००७) में एक अस्पेर्गेर सिंड्रोम से पीड़ित व्यक्ति या सर्व सिनेमांमध्ये शाहरुखने प्रेक्षकांना आपल्या भूमिकेने घायाळ केले.

अशा अनेक सिनेमांनी शाहरुखला किंग खान म्हणून ओळख मिळवली. अपार यशानंतर तो आपल्या वैयक्तिक जीवनातही किंग ठरला. गौरी आणि शाहरुखची भेट एका डान्स पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले आणि २५ ऑक्टोबर १९९१ ला शाहरुख-गौरी लग्नाच्या बेडीत अडकले. शारुखनला तीन मुलं आहेत. आर्यन खान, सुहाना खाना आणि अबराम खान.

इ.स.१९९२ दीवाना
इ.स.१९९३ माया मेमसाब
इ.स.१९९४ कभी हाँ कभी ना सुनील
इ.स.१९९५ करण अर्जुन
इ.स.१९९७ कोयला
इ.स.१९९८ दिल से
इ.स.१९९९ बादशाह
इ.स.२००० फिर भी दिल है हिंदुस्तानी
इ.स.२००१ वन टू का फोर
इ.स.२००२ देवदास
इ.स.२००३ चलते चलते
इ.स.२००४मैं हूं ना
इ.स.२००५ पहेली
इ.स.२००६ कभी अलविदा ना कहना
इ.स.२००७ चक दे! इंडिया
इ.स.२००८ रब ने बना दी जोडी
इ.स.२०१० माय नेम इज खान
इ.स.२०११ रा.वन
इ.स.२०१२ जब तक है जान
इ.स.२०१३ चेन्नई एक्सप्रेस
इ.स.२०१४ हॅपी न्यू इयर
इ.स.२०१५ दिलवाले
इ.स. २०१६ फॅन
इ.स. २०१७ रईस

 

Related posts

ज्येष्ठ अभिनेत्री आणि बालरंगभूमीच्या कर्ताधर्ता सुधा करमरकर यांचे निधन

अपर्णा गोतपागर

राम कदम पुन्हा चर्चेत, अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड ट्विटरद्वारे ट्विट

News Desk

#HappyBirthdayLataDi | राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजय पाटील यांना जाहीर

News Desk