HW News Marathi
मनोरंजन

भूषण कुमार यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल मी माफी मागते !

मुंबई | टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर त्यांच्याच महिला सहकाऱ्याने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, आता या महिलेने भूषण कुमार यांच्यावर आपण खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांची माफी मागितली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेत या महिलेने भूषण कुमार यांच्यावर आपण खोटे आरोप केल्याची कबुली दिली आहे.

“भूषण कुमार यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल मी माफी मागते. मी त्यांच्यावर नैराश्यातून आरोप केले. मला त्यांची प्रतिमा मलीन करायची असून मी यापुढे त्यांच्यावर कधीही असे आरोप करणार नाही,’ असे या महिलेने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चित्रपटात काम देण्यासाठी भूषण कुमार यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली त्याचप्रमाणे करिअर उद्ध्वस्त करुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप काहीच महिन्यांपूर्वी या महिलेने केला होता. त्यावेळी भूषण कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. ‘मी सिनेसृष्टीत अगदी नवीन होते. दुसऱ्याच दिवशी मला चित्रपटातून देखील काढून टाकण्यात आले,’ असेही या पीडित महिलेने यावेळी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधी लपविले नाही, तरी देखील नागरिकत्वावरून वाद का ?

News Desk

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

News Desk

३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

swarit