HW News Marathi
मनोरंजन

इंडियन आयडाॅलच्या स्पर्धकाला १ लाख ७० हजारांचा गंडा

मुंबई | इंडियन आयडॉल १० ची’ स्पर्धक अवंती पटेल सायबर फ्रॉडची शिकार ठरली आहे. सायबर फ्रॉडद्वारे अवंती आणि तिच्या बहिणीच्या अकाऊंटमधून तब्बल एक लाख ७० हजार रुपयांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी यूपीआयच्या माध्यमातून तिच्या अकाऊंटमधून पैसे चोरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अवंती पटेलने या प्रकरणी मुंबईच्या सायन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

“चोरट्याने दोघींच्या बँक खात्यांची सगळी माहिती कशी मिळाली, दोन्ही कार्ड ब्लॉक असूनही त्यामधून पैसे कसे ट्रान्सफर केले”, असे प्रश्न आम्हाला पडल्याचे अवंतीचे वडील पंकज पटेल म्हणाले. तसेच डेटामध्ये छेडछाड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. “चोरट्याने बनावट यूपीआय बनवून त्याचा वापर केला.

यामुळे चोरट्याला तिच्या अकाऊंटची संपूर्ण माहिती मिळाली. या प्रकरणात डेटा लीक झाल्याची शक्यता असू शकते. अवंती पटेलने केवळ एक्स्पायरी डेट शेअर केली, परंतु चोरट्याकडे आधीच सर्व माहिती होती,” असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलमोहर फुलला

swarit

आषाढ महिन्यातल्या दीपपूजेविषयी थोडक्यात… 

News Desk

थंडावा देणारा ताडगोळा

swarit