लॉस एंजेलिस | जगभरातील सिनेसृष्टीसाठी मानाचा मानला जाणारा ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा आज (२५ फेब्रुवारी) पार पडला. भारतातील दिल्लीजवळील हापुडा जिल्ह्यातील एका गावातील सॅनिटरी नॅपकीन बनवणाऱ्या काही महिलांची कथा ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ या लघुपटाने ‘डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’ या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ लघुटपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकविला आहे. रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
Look who stopped by the #Oscars Thank You Cam, presented by @Cadillac! Best Documentary Short winners for Period. End of Sentence. #KeepRising pic.twitter.com/NssJfSPkI3
— The Academy (@TheAcademy) February 25, 2019
‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ या २६ मिनिटांच्या असून पॅड उपलब्ध नसणे ही महिलांसाठी एक गंभीर समस्या आहे. पॅडअभावी मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना आजारांशी सामना करावा लागतो. त्यात त्यांचा मृत्यूही ओढवतो. हा सिनेमा ‘पॅडमॅन’ अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार आहे. स्नेह नावाची तरुणी आपल्या मैत्रींणीसोबत सॅनेटरी पॅड बनवण्याचे उद्योग करते. त्याचबरोबर, त्याच गावात असणार्या एक पॅड मशीन आणि त्या महिलांचे अनुभव सांगणार हा लघुपट आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुनीत गोंगा यांनी त्यांच्या ट्विटरवरून आनंद व्यक्त केला आहे. गुनीत मोंगा यांनी ‘लंच बॉक्स’, ‘मसान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ब्लॅक शीप, एंड गेम, लाइफबोट आणि अ नाईट अॅट दी गार्डन या लघुपटांना मात देत ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ने बाजी मारली.
WE WON!!! To every girl on this earth… know that you are a goddess… if heavens are listening… look MA we put @sikhya on the map ❤️
— Guneet Monga (@guneetm) February 25, 2019
असा झाला ऑस्कर पुरस्कार सोहळा
- सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट : रोमा
- सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री : रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)
- सर्वोत्कृष्ट सहअभिनेता : माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट : स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट : पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट : फर्स्ट मॅन
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : स्किन
- सर्वोत्कृष्ट वेशभुषा : रुथ कार्टर
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.