मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमा बनविण्याचा ट्रेंड सुरू आहे. यात खेळाडू, राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकार अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन प्रवास उलडणारी बायोपिक बनविण्यात येते. आता यात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द आयर्न लेडी‘ या बायोपिकमधून त्यांच्या जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या बायोपिकचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
जयललिता यांनी टॉलिवूडमध्ये अभिनयापासून ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपर्यंचा प्रवास द आयर्न लेडी या बायोपिकद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शनी करणार आहेत. दक्षिणात्या सिनेमा निर्माते मुरुगदास यांनी या सिनेमाचे पोस्टर त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे.
Extremely happy and excited to launch the Title poster of #Jayalalithaabiopic #THEIRONLADY I wish @priyadhaarshini and team for a grand success.. pic.twitter.com/4c87Xxks74
— A.R.Murugadoss (@ARMurugadoss) September 20, 2018
मुरुगदास यांनी बॉलिवूडमध्ये आमीर खानचा गजनी आणि अक्षय कुमारच्या हॉलिडे यासारख्या दमदार सिनेमची निर्मिती केली आहे. मुरुगदास आता जयललितांवर आधारित या बायोपिकवर काम करणार आहेत. परंतु या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कोणती अभिनेत्री कोण असाणार हे अद्याप समजलेले नाही. दाक्षिणात्या अभिनेत्री वारालक्ष्मी यांनी या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, असे ट्विट केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.