मुंबई | कादर खान यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दाग’ चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. कादर खान यांनी त्यांच्या चित्रपटात विनोदी भूमिकांसह खलनायकापर्यंत सर्व भूमिका उत्तमरीत्या वठविल्या. कादर खान हे जितके उत्तम अभिनेते होते तितकेच उमदे संवाद लेखक होते. खान यांनी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासह अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखक म्हणून काम केले आहे.
“विजय दीनानाथ चौहान…पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र छत्तीस साल नऊ महिना आठ दिन और ये सोलहवां घंटा चालू है…!”, अग्निपथ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला हा अत्यंत सुप्रसिद्ध डायलॉग कादर खान यांनी लिहिलेला आहे. अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज लक्षात घेऊन त्यांच्या आवाजाला शोभेल असाच दमदार डायलॉग खान यांनी लिहिला. त्याचमुळे या चित्रपटाचे श्रेय जितके अमिताभ बच्चन यांना जात तितकेच कादर खान यांना देखील जाते.
T 3045 – Kadar Khan passes away .. sad depressing news .. my prayers and condolences .. a brilliant stage artist a most compassionate and accomplished talent on film .. a writer of eminence ; in most of my very successful films .. a delightful company .. and a mathematician !! pic.twitter.com/l7pdv0Wdu1
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 1, 2019
मनमोहन देसाई आणि मेहरा यांच्यासह अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन
अमर अकबर अँथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर, देशप्रेमी, सुहाग, हे मनमोहन देसाई-कादर खान या जोडीचे चित्रपट प्रचंड गाजले. तर मेहरा-कादर खान यांच्या जोडीने ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर या प्रसिद्ध चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले होते. ‘हो गया दिमाग का दही’ हा कादर खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
जवळपास २५० हूनही अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन
कादर खान यांनी तब्बल ३०० चित्रपटांत काम केले असून २५० हूनही अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले. कादर खान यांना ३ वेळा फिल्मफेअर पुरस्कारने आणि २०१३ साली साहित्य शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘हो गया दिमाग का दही’ हा कादर खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.