HW News Marathi
मनोरंजन

केतकी माटेगावकर, रोहित राऊत आणि वैशाली माडे यांचे “अहिल्या”साठी पार्श्वगायन

उमा शिंदे |

मुंबई | आशयघन चित्रपट हीच मराठी चित्रपटसृष्टीची ओळख आहे. संवेदनशील चित्रपट असो वा स्त्रीप्रधान चित्रपट असो ते दिग्दर्शित करताना दिग्दर्शकाचा खरा कस लागतो. याचबरोबर चित्रपटाचे संगीतही महत्त्वपूर्ण दुवा असतो. कथानकाला साजेसे संगीत असणे खूप गरजेचे असते .

साईश्री क्रीएशनच्या बॅनरखाली निर्माता श्रीधर चारी यांचा, राजू पार्सेकर यांचे दिग्दर्शन लाभलेला मराठी चित्रपट” अहिल्या” प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर यांनी दोन महत्त्वपूर्ण गाणी रेकॉर्ड केली. यातील पहिले गीत केतकी माटेगावकर, रोहित राऊत यांनी, तर दुसरे गाणे वैशाली माडे यांनी गायली आहेत. या दोन्ही गाण्याची वैशिष्ट्य म्हणजे संगीतकारांनी गाण्याला दिलेला वेगळा ढंग.

दर्जेदार चित्रपट देणारे राजू पार्सेकर यांचे दिग्दर्शन लाभल्याने चित्रपटाविषयी अधिकच उत्सुकता आहे. आपल्या संगीताने व गायकीने प्रकाशझोतात असणारे प्रवीण कुवर यांचे संगीत हा चर्चेचा विषय असतो. त्यांचा रंगढंग वेगळाच असल्याने संगीत लक्षात राहणारे असते. साईश्री क्रीएशन्सचा यापूर्वी “पोलिस लाईन” चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळेस “अहिल्य” चित्रपटातून एक आशयघन चित्रपटाची पर्वणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या गाण्याचे लिखाण नितीन रमेश तेंडुलकर, राजेश बामुगडे यांनी केले आहे. शब्द व संगीत जनमानसात रुळण्यासारखे आहे. सोपे शब्द व सुमधुर संगीताने या दोन्ही गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल, हे मात्र निश्चित.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आलोकनाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk

९ डिसेंबरला विक्रांत सरंजामेचा ‘प्रपोज डे’? 

News Desk

राहुल गांधींच्या बायोपिकचा टिझर लॉंच

News Desk