HW News Marathi
मनोरंजन

लक्ष्मीकांत-प्रिया यांची हिट केमिस्ट्री

अश्विनी सुतार | दादा कोंडके-उषा चव्हाण, यांच्याप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण ही मराठी चित्रपटसृष्टीतील रुपेरी जोडी मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. रुपेरी पडद्यावर जमलेली, खुललेली लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची जोडी खऱ्या जीवनातही तितकीच खुलून आली.

आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्यासह विवाह केला. तोपर्यंत ‘अशीही बनवा बनवी, डोक्याला ताप नाही ,शेम टू शेम ,कुठं कुठं शोधू मी तिला, नशीबवान’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून तर हिंदीत ‘हम आपले हैं कौन, बेटा’ अशा काही निवडक चित्रपटांमधून देखील त्यांनी दोघांनी कामे केली.

प्रिया यांना लक्ष्मीकांत यांच्या आवडीनिवडी माहित असत. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मासे आवडतात याची कल्पना प्रिया यांना होती. त्यामुळे त्या कायम लक्ष्मीकांत यांच्यासाठी मासे घेऊन यायच्या.

त्याकाळच्या सर्व अभिनेत्रींना आपला हिरो लक्ष्मीकांत असावा असे वाटत असे. परंतु लक्ष्मीकांत यांची सहअभिनेत्री म्हणून पहिली पसंद प्रिया या असायच्या. याच कारण म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटाच्या सेटवरही त्या दोघांचे एक अनोखे नाते होते. लक्ष्मीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक प्रिया यांना कायम असायचे. दोघांची ही रुपेरी कमेस्ट्री कधी जुळत गेली हे त्यांना देखील लक्षात आले नाही.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूपच छान होती. त्यांची जोडी प्रेक्षांना जवळची वाटे. १९९०चे दशक हे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अक्षरशः गाजवलं आहे. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या प्रेक्षकांच्या मनात एक अढळ असे स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत गुणी आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून आजही ओळखले जातात. त्यांचे चाहते त्यांना कधीही विसरणार नाहीत.

Related posts

‘काला’ सिनेमा सुपरस्टारचा सुपर शो

News Desk

किंग खानने घेतली दिलीप कुमार यांची भेट

News Desk

भारताने कोरले ‘या’ दोन ऑस्कर पुरस्कारांवर नाव

Aprna