HW News Marathi
मनोरंजन

नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी द्यावी | कंगना रणावत

मुंबई | २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत. देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ५ वर्षाचा कालावधी खूप कमी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी, असे विधान अभिनेत्री कंगना रणावत यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणाचा संघर्ष ‘चलो जीते है’ या लघुपटामधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन मंगेश हदावले यांनी केले असून ३२ मिनिटांची ही लघुपटा आहे. या लघुपटाचा प्रीमिअर शनिवारी लोअर परळ येथे पार पडला. या प्रीमिअर दरम्यान कंगना रणावतने पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतुक केले. तसेच कंगणा पुढे असे देखील म्हणाली की, नरेंद्र मोदी हे आज ज्या पंतप्रधान सारख्या उच्च पदावर आहेत. ते त्यांच्या आईवडिलांमुळे नाही. तर ते स्वबळावर या पदापर्यंत पोहोचले आहेत.

या लघुपटाच्या प्रीमिअरला कंगना व्यतिरिक्त खिलाडी अक्षय कुमार, गुलशन ग्रोवर, अमिषा पटेल आणि संजय खान आदी कलाकार देखील उपस्थित होते.

Related posts

एजाज खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

swarit

आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

News Desk

आज चंद्र पूर्ण लाल दिसणार; 152 वर्षांनंतर दुर्मिळ योग

Adil