HW News Marathi
मनोरंजन

पद्मावत’ सिनेमावर हरियाणात बंदी

चंदीगड – बहुर्चित ‘पद्मावत’ हा सिनेमा येत्या २६ जानेवारी रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला परवागी देऊन ही हरियाणात हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही. हरियाणाच्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे कारण दाखवून सरकारने या सिनेमावर बंदी घातली आहे.

दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांनी इतिहासाशी छेडछाड करुन हा सिनेमा बनवला असल्याचा आरोप राजपूत समाज आणि करणी सेनेने विरोध दर्शविला आहे. या विरोधानंतर भन्साळी यांनी सिनेमाचे ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’केले आहे. तसेच सेन्सॉर बॉर्डाच्या सूचनेनुसार या सिनेमातील काही सीन्स कट करण्यात आले आहे.

‘सेन्सॉर बॉर्ड आणि निर्मात्यांने सिनेमात काही बदल करुन हा सिनेमा रिलीज करण्याच्या निर्णयावर करणी सेना नाराज असून या सिनेमावर बंदी घालण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. सिनेमा रिलीज झाल्यानंतर जे काही होईल याला सेन्सॉर बॉर्ड आणि भाजप सरकार जबाबदार असेल अशी धमकी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी सांगितले.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीचा बायोपिक वादाच्या भौऱ्यात

News Desk

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय

News Desk

उदयनराजेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

News Desk