मुंबई | ‘पियानो फॉर सेल’ ह्या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर ३० नोव्हेंबर २०१८ रोजी, दादर येथील श्री शिवजी मंदिर नाट्यगृहात पार पडला आहे. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ह्या वेळी मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार आवर्जून उपस्थित राहिले. उषा मंगेशकर, मीना खडीकर, शिवाजी साटम, किरण शांताराम, अनुप जलोटा, दिपक बलराज विज, गश्मीर महाजनी , अनुराधा राजध्याय हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
पियानो फॉर सेल ह्या नाटकासाठी २ दिग्गज कलाकार वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज प्रथमच एकत्र आलेले आहेत, त्यामुळे रसिक प्रेक्षकांना हा अनुभव प्रचंड आनंददायी ठरणार आहे. हा अनुभव रंगभूमीवरचा असल्याने तो अधिक रंगतदार ठरत आहे. या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशय आणि सादरीकरणाने ‘पियानो फॉर सेल’ला एका उंचीवर घेऊन गेले आहेत.
लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित ‘पियानो फॉर सेल’ या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे. प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिजिटल डिटॉक्स निर्मिती संस्था – यांच्या ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाद्वारे, एक अत्यंत अविस्मरणीय अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.