मुंबई । हिंदी बिग बॉस पाठोपाठ मराठीने देखील बिग बॉस मध्ये पदार्पण केलं. मराठी बिग बॉसचा पहिल्या पर्व असला तरी मराठी रसिक प्रेक्षकांनी बिग बॉस मोठ्या उत्सहाने पहिले. जवळपास १०० दिवस एकत्र राहून, भांडून झाल्यानंतर आता सगळे स्पर्धक अंतिम फेरीची वाट पाहत आहेत. आणि आता या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले अवघ्या एका दिवसावर आला आहे. बिग बॉस मराठीचा अंतिम सामना धम्माकेदार होणार यात वादच नाही. ज्या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी इतक्या जल्लोषात झाली त्याची सांगता पण तशीच जल्लोषात होणारआहे. संपूर्ण महाराष्ट्राचं बिग बॉस मराठीच्याअंतिम फेरीकडे लक्ष लागून राहिलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात जितकी धमाकेदार झाली तितकाच धमाकेदार याचा शेवट होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. अंतिम फेरीमध्ये सहा स्पर्धक पोहोचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र काय तर जग ज्या दिवसाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होता तो क्षण आला आहे. अवघ्या दोनच दिवसात प्रेक्षकांना कळणार ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता कोण आहे. बिग बॉसच्या अंतिम फेरीची तयारी सुरु झाली असून बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. अंतिम फेरीत पोहोचलेले सहा स्पर्धकसुद्धा परफॉर्म करणार आहेत. ज्यामध्ये मेघा, शर्मिष्ठा, आस्ताद, स्मिता, पुष्कर, सई यांचे अफलातून डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋतुजा, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे.अंतिम फेरीमध्ये ६ स्पर्धक पोहचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आज विकेंडच्या डावांमध्ये काय होणार ? कोणते सरप्राईझ मिळणार ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Dashing Girl म्हणून ओळखली जाणीरी Smita ठरेल का विजेती? पाहा #BiggBossMarathi Grand Finale 22 जुलै. संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर.
Follow करा #BiggBossMarathi चं official account: @biggbossmarathi@AastadKale @SmitaGondkar @meghadhade @jogpushkar #SaiLokur #SharmishthaRaut pic.twitter.com/diqPNvvnP8
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.