HW Marathi
मनोरंजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक ‘या’ दिवशी होणार रिलीज

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरेंद्र मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमारने असून हा सिनेमा ५  एप्रिल ऐवजी १२ एप्रिलला प्रदर्शित होणार  असल्याची माहिती खुद्द ओमंग यांनी ट्विट करून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्पा मतदान ११ एप्रिल होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल रोजी होणरा आहे.  तसेच मोदींच्या जीवनावर आधारित सिनेमाच १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा निवडणुकीच्या काळात प्रदर्शित झाल्याने मोदींना लोकसभेवर काय परिणाम पडेल हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विवेकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायला टाके पडले होते आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदींच्या भूमिकेत विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. तर अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी तर मोदींची आई हिराबेनच्या भूमिकेत जरीना वहाब दिसणार आहे. त्यांची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता निभावणार आहे.

Related posts

लक्ष्मीकांत-प्रिया यांची हिट केमिस्ट्री

News Desk

सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत

News Desk

अभिनेता सलमान खानला वनविभागाची नोटीस

News Desk