मुंबई | सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडिल आणि निर्माते राजकुमार बडजात्या यांजे आज (२१ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले आहे. बडजात्या हे राजश्री फिल्मचे संस्थापक आहे. मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
It is with profound grief that we mourn the loss of Raj Kumar Barjatya, father of Sooraj Barjatya. May his soul Rest In Peace. pic.twitter.com/DjVejWTDMX
— Rajshri (@rajshri) February 21, 2019
राजश्री प्रॉडक्शनने आपल्या ऑफिशिअल हँडलवरुन ट्वीट करुन राजकुमार बडजात्या यांच्या निधनाची बातमी दिली. राजश्री प्रॉडक्शनच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडला दर्जेदार चित्रपटांची मेजवानीच दिली होता. ७०, ८० आणि ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनच्या माध्यमातून राजकुमार बडजात्या यांनी केली
राजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली. १९७२ साली आलेला पिया का घर, १९९४ मध्ये गाजलेला हम आपके है कौन, १९९९ चा हम साथ साथ है, असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिलेत. गत १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.