HW News Marathi
मनोरंजन

शाहरुखचा झिरो मोठ्या साईजमध्ये रिलीज

मुंबई | बॉलीवूड बादशहा शहारुख खानचा आगामी ‘झिरो’ या चित्रपटाची झलक पाहण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहात होतो. झिरो या चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे शाहरुखसोबत भाईजान सलमान खान देखील दिसत आहे. इतकंच नाही तर सलमानने शाहरुखला कडेवरती घेऊन त्याचासोबत डान्स करताना दिसत आहे. आज सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.

झिरो हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असून झिरो चित्रपटातून शाहरुख खान पहिल्यांदाच एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात शाहरख खानसोबत, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद. एल. राय यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

News Desk

आयपीएल सट्टा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अरबाजची चौकशी

News Desk

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

swarit